राजाराम अर्ज दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजाराम अर्ज दाखल
राजाराम अर्ज दाखल

राजाराम अर्ज दाखल

sakal_logo
By

शेवटच्या दिवशी १३५ इच्छुकांचे उमेदवारी अर्ज
कोल्हापूर, ता. २६ : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या २१ जागांसाठी आज २३६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आजच्या शेवटच्या दिवशी १३५ इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडणूक निणर्य अधिकारी निलकंळ करे आणि सहायक प्रदीप मालगावे यांनी उमेवारी अर्ज स्वीकारले. उद्या (ता. २७) उमदेवारी अर्जांची छाननी होणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास झुंबड उडाली. दरम्यान, यापूर्वीच माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, सर्जेराव माने यांनी दाखल केले होते. तर, आता विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील, भास्कर शेटे, सुरेश तांमगे, बाजीराव पाटील, मोहन सालपे यांच्यासह इतरांनी अर्ज दाखल केले आहेत. व्यक्ती उत्पादक सभासद गट क्रमांक एक मधून १४ अर्ज, गट क्रमांक दोनमधून ३१ अर्ज, गट क्रमांक तीनमधून ३४, गट क्रमांक चार मधून २८, गट क्रमांक पाच मधून १८, गटक्रमांक सहामधून ४१, महिला राखीव प्रतिनिधी गटातून २०, इतर मागास गटातून १६, अनुसूचित जाती-जमाती गटातून १५, भटक्‍या जाती जमातीमूधन १२ व संस्था गटातून ७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आज अखेर ४३२ उमदेवारी अर्ज दाखल झाले होते. यापैकी २३६ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
...
मौकट
तीन टप्प्यात छाननी
उमेदवारी अर्ज छाननी उद्या (ता. २८) होत आहे. ही छाननी तीन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात व्यक्ति सभासद गट क्रमांक १ ते ३ पर्यंत, दुसरा टप्प्यात गटक्रमांक ४ ते ६ ची छाननी होईल. तर तिसऱ्या टप्प्यात सर्व राखीव मतदारसंघ व संस्था गटाची छाननी होईल. छाननीसाठी केवळ उमेदवाराच उपस्थित राहू शकतील. उमेदवारांच्या गैरहजेरीत त्यांचे सूचक उपस्थित राहू शकतील.
...
चौकट
विद्यमान १९ पैकी सहा संचालकाचे अर्ज
विद्यमान १९ पैकी सहा संचालकाने आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत यामध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील, दिलीप उलपे, प्रशांत तेलवेकर आणि कल्पना पाटील यांचा समावेश आहे. दरम्यान या निवडणुकीत दोन नवीन संचालक नियुक्त करावी लागणार आहेत. त्यामुळे विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या पॅनेलमध्ये १५ नव्या चेहऱ्याना संधी मिळण्याची शक्यता आहे.