आजरा ः आगीत नुकसान

आजरा ः आगीत नुकसान

ajr283.jpg 92046 उचंगी (ता. आजरा) ः येथे आगीमुळे झालेले काजू बागांचे नुकसान.

उचंगीत काजू बागांना आग
आजरा, ता. 28 ः उचंगी (ता. आजरा) येथे लागलेल्या वणव्यात काजू बागा जळल्या. वीस एकरातील काजू बागा जळाल्या असून, सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. जंगलातून आलेल्या वणव्यामुळे या बागा जळाल्या असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
उचंगी बसस्थानकानजीक बल्डींग नावाची शेती आहे. यात शेतकऱ्यांनी काजू बागा तयार केल्या आहेत. यामध्ये आंबा, फणस, चिकू याचीही झाडे आहेत. पावसाळ्यामध्ये यामध्ये भात शेती केली जाते. उन्हाळ्यात ही जमिन पड असते. उचंगी जंगलातून आज दुपारी साडे बारा वाजता वणवा या परिसरात आला. वाळलेले गवत, उन्हा तीव्र तडाखा यामुळे आग पसरत गेली. सुमारे वीस एकराहून अधिक परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून माती, पाणी व झाडांच्या फांद्याच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण, आग नियत्रंणात आली नाही. सुमारे चार तास आगीचा तांडव सुरू होता. दुपारी चार वाजता आग आटोक्यात आणण्यात ग्रामस्थांना यश आले. भारती धनाजी शिंदे, रवळनाथ देसाई, धोंडीबा खांडेकर यासह पाच सहा शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com