चित्रनगरी निधीला मान्यता

चित्रनगरी निधीला मान्यता

लोगो- चित्रपटाचे रिळ
.............

चित्रनगरीतील विविध
कामांना आता येणार गती

वीस कोटीच्या निधीला मिळाली मान्यता

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः येथील चित्रनगरीतील विविध कामांना आता आणखी गती येणार आहे. विविध कामांसाठी एकूण वीस कोटीच्या निधीला आज पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने मान्यता दिली आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवांतर्गत स्थापन झालेल्या कोअर समितीच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झाला आहे.
चित्रनगरीतील विविध कामांसाठी निधी उपलब्ध होवून आता प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे. त्याशिवाय आणखी तीन नवे प्रोजेक्ट चित्रनगरीत चित्रीकरणासाठी येणार असून, एका हिंदी टॉक शोबरोबरच दोन मालिकांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे चित्रीकरणालाही गती येणार आहे.

निधी व कामे अशी...
चित्रनगरी परिसरामध्ये रेन वॉटर हार्वेस्टींगसाठी एक कोटी दहा लाख, अंतर्गत रस्ते व पथदिव्यांसाठी दोन कोटी ९४ लाख, चित्रीकरणासाठी एका बंगल्याच्या बांधकामासाठी दोन कोटी ८५ लाख, वीस खोल्यांच्या सुसज्ज वसतिगृह व फर्निचरसाठी सात कोटी ९८ लाख तर रेल्वेस्थानक उभारणीसाठी पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com