रवळनाथ संस्था

रवळनाथ संस्था

फोटो क्रमांक : gad296.jpg
92182
सांगली : सामंजस्य कराराची प्रत एम. एल. चौगुले यांच्याकडे सुपूर्द करताना प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी. प्रा. व्ही. के. मायदेव, प्रा. डॉ. किरण पोतदार, श्रेयस गाडवे उपस्थित होते.
------------------------------------------------
‘रवळनाथ-गरवारे’मध्ये सामंजस्य करार

गडहिंग्लज, ता. २९ : सांगलीतील श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय आणि श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटी (मल्टी-स्टेट) यांच्यात सामंजस्य करार झाला. गरवारे महाविद्यालयात कार्यक्रम झाला. ‘रवळनाथ’तर्फे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले तर महाविद्यालयातर्फे प्राचार्य तथा रवळनाथ सांगली शाखेचे सल्लागार डॉ. आर. जी. कुलकर्णी यांनी करारावर सह्या केल्या.
श्री. चौगुले म्हणाले, ‘शिवाजी विद्यापीठासह कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतेक सर्व महाविद्यालयांनी रवळनाथशी सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे संयुक्तरित्या विविध शैक्षणिक उपक्रम राबविणे शक्य होते. शैक्षणिक वर्षात विद्यापीठ, गरवारे महाविद्यालय व रवळनाथतर्फे ''नवे शैक्षणिक धोरण'' विषयावर सांगलीत चर्चासत्र होईल. रवळनाथचे उपाध्यक्ष प्रा. व्ही. के. मायदेव, संचालक प्रा. डॉ. किरण पोतदार, सांगलीचे शाखाधिकारी श्रेयस गाडवे, प्रा. डॉ. व्ही. एस. गायकवाड, प्रा. आर. जी. देशपांडे, प्रा. डॉ. व्ही. एम. होनमोरे, प्रा. डॉ. यु. एन. क्षीरसागर, प्रा. डॉ. एस. एम. दळवी, प्रा. आर. व्ही. पाटील, प्रा. डी. एस. देशपांडे उपस्थित होते. प्रा. ए. एस. सुगते यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. एन. जी. काळे यांनी आभार मानले.

चौकट...
दोन महिन्यात १ कोटी
‘रवळनाथ’च्या सांगली शाखेलाही ठेवीदार, कर्जदार व ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. अवघ्या २ महिन्यात तब्बल १ कोटीच्या ठेवी ठेवून सांगलीकरांनीही ‘रवळनाथ’वर विश्वास व्यक्त केल्याचे श्री. चौगुले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com