क्षयरोग कार्यशाळा

क्षयरोग कार्यशाळा

क्षयरोगाला घाबरून न जाता
औषधोपचारासाठी पुढे यावे
डॉ. प्रकाश पावरा; क्षयरोग जनजागृती कार्यशाळा
कोल्हापूर, ता. ३० : ‘क्षयरोगाला अटकाव करण्यासाठी महापालिकेच्यावतीने रुग्णांचा शोध, मोफत औषधोपचार व योग्य पोषणासाठी फूड बास्केट यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जनतेने घाबरून न जाता निदान व औषधोपचारासाठी पुढे आले पाहिजे’, असे आवाहन शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी केले.
जनतेमध्ये क्षयरोगाविषयी जनजागृती व्हावी यासाठी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा महापालिकेच्या क्षयरोग विभागाने आज आयोजित केली होती. त्यात क्षयरोगाविषयी सखोल माहिती देण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. पावरा म्हणाले, ‘‘जास्तीत जास्त सुविधा रुग्णांपर्यंत पोहचविण्यासाठी काम केले जात आहे. पहिल्या सहा महिन्यांच्या कालावधीतच रोग बरा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. नातेवाईक, मित्रांपर्यंत संदेश पोहचविणे आवश्यक आहे. क्षयरोग औषधोपचार घेतल्यास पूर्ण बरा होतो.’’ यावेळी डॉ. रूपाली दळवी यांनी औषधोपचार न घेतल्यास किंवा अर्धवट औषधोपचार घेतल्यास एमडीआरसारखा क्षयरोग होऊ शकतो. त्यासाठी बराच काळ औषधे घ्यावी लागतात. त्यामुळे क्षयरोग मुक्ततेसाठी जनतेनेही साथ देणे गरजेचे आहे. डॉ. अमोल माने यांनी आभार मानले. या वेळी प्रसार माध्यमातील प्रतिनिधी, क्षयरोग विभागातील विविध अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com