काजू बीच्या संख्येवर ठरतोय किलोचा दर ?

काजू बीच्या संख्येवर ठरतोय किलोचा दर ?

काजू बीच्या संख्येवर ठरतोय किलोचा दर ?
कोकणातील बीला प्राधान्य; स्थानिक बीचा दर सध्या १०० रुपये किलो
सुनील कोंडुसकर ः सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ३० ः एक किलो वजनासाठी किती काजू बिया जोखल्या जातात यावर त्या बीचा दर ठरतो. कोकणातील भेडशी, बांदा, दोडामार्ग परीसरातील बी आकाराने व वजनाने मोठी असल्याचे ती सर्वोत्कृष्ट मानली जाते. चंदगड, आजरा परीसरातील बी आकाराने लहान असल्याने प्रक्रिया खर्च वाढतो. पर्यायाने या बीला दर कमी मिळतो. सध्या कोकणातील बीला १२५ रुपये तर स्थानिक बीला १०० रुपये दर मिळत आहे.
दरवर्षी काजूच्या हंगामात बियांच्या दरावर घमासान चर्चा होते. स्थानिक शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाही असा सूर असतो. प्रक्रीया उद्योजकांकडून आकाराने मोठ्या बीला मागणी असते. कोकणातील बीची संख्या एक किलोसाठी सुमारे १३० असते. चंदगड, आजरा परीसरात मात्र हीच संख्या दोनशे ते २१० पर्यंत भरते. १ टन मोठ्या बियांवर प्रक्रीया केल्यानंतर तयार होणाऱ्या गराएवढे गर लहान बियातून काढायचे झाल्यास दिड टन बीयांवर प्रक्रीया करावी लागते. त्यामुळे प्रक्रीया खर्चात मोठी वाढ होते. आकाराने लहान असलेली बी प्रक्रीया करताना मशीनमध्ये योग्य पध्दतीने सापडत नसल्याने ती टलफरात जाते. टलफराची विक्री अत्यंत कमी दरात होते. बीसाठी पैसे मोजावे लागतात. त्यातून गर न मिळता टलफर होत असेल तर तोही खर्च परवडणारा नसतो असे प्रक्रीया उद्योजकांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्थानिक बी पेक्षा कोकणातील बीला महत्व दिले जाते. दरम्यान स्थानिक भागात अजूनही पारंपारीक जूनी काजूची झाडे आहेत. त्याची बी आकाराने लहान आहे. परंतु संकरीत झाडाची मोठी बी असतानासुध्दा स्थानिक बाजारपेठेत सर्वच बीसाठी एकच दर लागू केल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची तक्रार आहे. मोठ्या बिया स्वतंत्र काढून ठेवल्यास त्याला कोकण प्रमाणे दर देणे गरजेचे आहे. शिवाय भविष्यकालीन कच्या मालाचा विचार करता स्थानिक भागात संकरीत झाडांची लागण वाढवणे, त्याची जोपासणा याबाबत शेतकऱ्यांत जनजागृती निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यायला हवा.
--------------
लहान आकाराच्या बीवर प्रक्रीया करणे त्रासदायक असते. त्यामुळे प्रक्रीया खर्च वाढतो. तो भरुन काढायचा झाल्यास खरेदी दर कमी केल्याशिवाय उद्योजकांपुढे पर्याय नसतो.
- दयानंद काणेकर, काजू प्रक्रीया उद्योजक, चंदगड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com