हसन मुश्रीफ महाआरती

हसन मुश्रीफ महाआरती

92517

महाविकास आघाडीतर्फे
श्री अंबाबाईची महाआरती
कोल्हापूर, ता. ३० : रामनवमी व माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त शहर-जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अंबाबाई मंदिराच्या महाद्वारावर महाआरती झाली. आमदार मुश्रीफ यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी या वेळी प्रार्थना झाली.
माजी महापौर आर. के. पोवार यांनी प्रास्ताविक केले. सुनील देसाई यांनी आभार मानले. या वेळी व्ही. बी. पाटील, गुलाबराव घोरपडे, आदिल फरास, राजू लाटकर, रमेश पोवार, अजित राऊत, विनायक फाळके, महेंद्र चव्हाण, अनिल घाटगे, जहिदा मुजावर, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, पूजा साळोखे, सीमा भोसले, श्‍वेता बडोदेकर, स्नेहल मठपती आदी उपस्थित होते.
--------------
‘गोकुळ’तर्फे औषधी
वनस्पतींची लागवड
राज्याचे माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त जिल्हा (गोकुळ) दूध संघातर्फे ताराबाई पार्क कार्यालयाच्या आवारात सत्तर औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. संघाचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. आमदार मुश्रीफ यांचे जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान असल्याचे या वेळी ते म्हणाले. या वेळी ज्येष्ठ संचालक अरूण डोंगळे, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, संभाजी पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, यु. व्ही. मोगले, बी. आर. पाटील, डॉ. पी. जे. साळुंके, डॉ. प्रकाश दळवी, सचिन पाटील आदी उपस्थित होते.
------------
गडहिंग्लजला विविध उपक्रम
गडहिंग्लज : गडहिंग्लज शहर व गिजवणे-कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांतर्फे आमदार हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा केला. ग्रामदैवताच्या मंदिरात महाआरती, उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना व साई मुकबधीर विद्यालयातील मुलांना फळांचे वाटप केले. शहरातील दिव्यांगांना धान्य वाटप केले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी किरण कदम, उदय जोशी, सिद्धार्थ बन्ने, वसंत यमगेकर, सुरेश कोळकी, बाळासाहेब घुगरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com