सामाजिक उपक्रमांनी अशोक स्वामी यांचा वाढदिवस

सामाजिक उपक्रमांनी अशोक स्वामी यांचा वाढदिवस

ich21.jpg
93004
इचलकरंजी ः अशोक स्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त आयजीएम रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले.

अशोक स्वामी यांचा
वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी

इचलकरंजी, ता. २ ः महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला. रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात ६५ जणांनी रक्तदान केले. नेत्र तपासणी शिबिराचा ८० जणांनी लाभ घेतला. अरुण विद्या मंदिर येथे विद्यार्थीना खाऊ वाटप केले. आयजीएम रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप केले. अब्दूललाट येथील बालोद्यान अनाथालयाला हातभार लावत जीवनावश्यक वस्तू सुपूर्द केल्या.
माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांच्याहस्ते विद्यार्थीना खाऊ वाटप केले. नेत्र तपासणी शिबिराचे उद्‍घाटन माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी केले. माजी नगराध्यक्षा ॲड. अलका स्वामी यांच्याहस्ते रक्तदान शिबीराचे उद्‍घाटन झाले. वीरशैव बँकेचे अध्यक्ष अनिल स्वामी, पोलिस निरीक्षक राजेंद्र काणे, माजी नगरसेवक दिलीप मुथा, सुनिल तोडकर, धनराज खंडेलवाल राजाराम तोडकर यांच्याहस्ते आयजीएम रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप केले. अब्दुललाट येथील बालोउद्यान येथे व्याख्याते प्रथमेश इंदुलकर व संग्राम स्वामी यांच्याहस्ते जीवनावश्यक वस्तू प्रदान केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com