पोलिस शिपाई भरती प्रवेश प्रक्रिया

पोलिस शिपाई भरती प्रवेश प्रक्रिया

93162
...

पोलिस शिपाई परीक्षेला ९० गैरहजर

अर्ज भरायचा मग परीक्षा का नाही द्यायची?

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २ ः जिल्हा पोलिस दलातील शिपाई पदासाठी आज सकाळी लेखी परीक्षा झाली. १९१ उमेदवारांनी ही परीक्षा दिली तर ९० उमेदवार अनुपस्थित होते. त्यांना परीक्षा द्यायचीच नव्हती तर मग अर्ज तरी का भरला? त्यांनी अर्ज भरला नसता तर अन्य उमेदवारांना संधी मिळाली नसती का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.
जिल्हा पोलिस दलातील शिपाई पदासाठी २४ जागांसाठी भरती सुरू आहे. शारिरीक चाचणीत निवड झालेलेल्या उमेदवारांची आज लेखी परीक्षा झाली. कसबा बावडा येथील डॉ.डी.वाय.पाटील इंजिनिअरींग कॉलेज हे परीक्षा केंद्र होते. पोलिस भरतीसाठी आज सकाळी राज्यात सर्वत्र एकाच वेळेत लेखी परीक्षेचे आयोजन केले होते. कोल्हापुरात रिक्त असलेल्या २४ जागांसाठी २८६ उमेदवार लेखी परीक्षेला बोलवले होते. त्यापैकी १९१ उमेदवारांनी परीक्षेला हजेरी लावली. बायोमेट्रीक हजेरीद्वारे उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात आला. व्हिडिओ चित्रीकरणासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सकाळी साडेआठ ते दहा या वेळेत परीक्षा पार पडली. प्रश्नपत्रिकांचे चार संच तयार करण्यात आले होते. परीक्षा संपल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी संकेत स्थळावर उत्तरतालिका जाहीर केली. या परीक्षेला सुमारे ९० विद्यार्थी गैरहजर होते. त्यांनी जर अर्ज भरलाच नसता तर अन्य ९० जणांना संधी मिळाली असती. परीक्षाच द्यायची नव्हती तर अर्ज भरला कशाला, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.
----

आज गुणतालिका होणार जाहीर

शारिरीक आणि लेखी परीक्षेतील गुण एकत्र करून उमेदवारांची गुणतालिका तयार केली जाणार आहे. सोमवारी (ता.३) ही गुणतालिका पोलिस दलाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. त्यानंतर ज्यांना काही शंका असतील त्यांची शारिरीक आणि लेखी परीक्षा घेतली जाऊन अंतिम यादी लावण्यात येईल. त्यानंतर या उमेदवारांची चारित्र्य पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे.

--------------------


पारदर्शकतेची खबरदारी

परीक्षा सुरक्षित वातावरणात आणि पारदर्शक व्हावी यासाठी सर्व खबरदारी घेण्यात आली होती. परीक्षा घेणे, निकाल लावणे येथे कोठेही मानवी हस्तक्षेपाला मर्यादेपेक्षा जास्त वाव ठेवण्यात आलेला नाही. केंद्रीय पद्धतीने परीक्षा घेतल्याने स्थानिक पातळीवर परीक्षेत कोणताही अनुचित प्रकार करण्यास यंत्रणेने वाव ठेवलेला नाही. या पूर्वी भरतीमध्ये जे अनुचित प्रकार घडले त्यावरून बोध घेत बायोमॅट्रीक, व्हिडीओ चित्रिकरण या गोष्टी करण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com