मानाच्या पैठणीची बुगडे मानकरी

मानाच्या पैठणीची बुगडे मानकरी

gad107.jpg
94889
गडहिंग्लज : होम मिनिस्टरमधील विजेत्यांना बक्षीस वितरण झाले. यावेळी महेश सलवादे, रेश्मा कांबळे, प्रियांका सलवादे, संतोष कांबळे, सुनीता नाईक उपस्थित होते.
--------------------------------------------------------------------
मानाच्या पैठणीची बुगडे मानकरी
भीमनगरात होम मिनिस्टर : मुगळी, मानेंनीही मिळविले पारितोषिक
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हसन मुश्रीफ फाउंडेशनतर्फे झालेल्या होम मिनिस्टरमध्ये रेखा बुगडे या मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या. याशिवाय प्रेशर कुकर, १५ किलो तेलाचा डबा असे बक्षीसही पटकावले. उपविजेत्या म्हणून निलांबरी मुगळी यांना पैठणी, मिक्सर, १० किलो तेल तर तृतीय क्रमांकाच्या ललिता माने यांना पैठणी, फॅन व ५ किलो तेल असे बक्षीस दिले.
विशाल बेलवळेकर-पाटील यांनी होम मिनिस्टरमधील विविध खेळांचे निवेदन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर फुटबॉल क्लब, महेश सलवादे युवा ग्रुपने संयोजन केले होते. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, उदय जोशी, बिनादेवी कुराडे, श्रद्धा शिंत्रे, हारुण सय्यद यांच्या उपस्थितीत उद्‍घाटन झाले. गीता पाटील व रविकिरण म्हेत्री यांच्या गाण्यांनी तर प्रेम सोनार, चिन्मय पोवार, यासीन बोजगर यांच्या नृत्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष महेश सलवादे, सतीश पाटील, उदय जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.
पालिका सेवक पतसंस्थेच्या नूतन संचालकांसह मल्लिकार्जुन आरबोळे, शिवराज पाटील यांचाही सत्कार झाला. महेश सलवादे, रेश्मा कांबळे, शर्मिला पोतदार, सुनीता नाईक, गीता पाटील, पूनम म्हेत्री, आशालता गोईलकर, उदय परीट, अमर मांगले, रामगोंड पाटील, संतोष कांबळे, रश्मीराज देसाई, महेश गाडवी उपस्थित होते. माजी नगरसेविका रेश्मा कांबळे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com