भावेश्वरी कॉलनीत पायाभूत सुविधा द्या

भावेश्वरी कॉलनीत पायाभूत सुविधा द्या

भावेश्वरी कॉलनीत पायाभूत सुविधा द्या
बुरुडेतील रहिवाशांची मागणी; आजरा तहसीलदारांना दिले निवेदन
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १६ ः बुरुडे (ता. आजरा) येथील नविन वसलेल्या भावेश्वरी कॉलनीमधील गट क्रमांक अनुक्रमे ३ व १३४, १३९, १३६ असे आहेत. यामध्ये निवासी रहीवासाकरीता अकृषक (एनए) प्लॉट तयार करून जागा मालकांनी विक्री केली. पण येथे पायाभुत सुविधा दिलेल्या नाहीत. त्या सुविधा द्याव्यात अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. याबाबतचे निवेदन आजरा तहसीलदार यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे, संबंधित जागा मालकांनी प्लाट अकृषक करून राहण्यासाठी विकले. पण तेथे गटर्स, रस्ते, वीज पुरवठा या पायाभूत सुविधा दिलेल्या नाहीत. संबंधीत जागामालकांनी अशा कोणत्याही सेवासुविधा न देता या प्लॉटमधील रहिवाशांची फसवणूक केली आहे. सध्या आपआपल्या खरेदी प्लॉटमध्ये नागरीकांनी गरजेपोटी घरे बांधली आहेत. परंतु घरांचे सांडपाणी किंवा ये जा करण्यासाठी रस्ते किंवा लाईट्स याची कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा दिलेल्या नाहीत. सांडपाण्यामुळे भविष्यात आरोग्याचा प्रश्न उद्‍भवु शकतो तरी आपण जागेची प्रत्यक्ष पाहणी करुन आम्हा रहीवाशांना न्याय मिळवून द्यावा.’ निहाल मुल्ला, महेफ मकानदार, आदम बकर, नामदेव घेवडे, सागर करमळकर, हानमंत जादुनवर, मोहन गावडा, मंगल घोरपडे, सागर गिरी अशा वीस रहिवाशांच्या सह्या निवेदनावर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com