शिक्षक संघातर्फे १२ शिक्षकांना पुरस्कार

शिक्षक संघातर्फे १२ शिक्षकांना पुरस्कार

96344
गडहिंग्लज : शिक्षक संघातर्फे आदर्श शिक्षक पुरस्काराने शिक्षकांना गौरविले. यावेळी राजाराम वरुटे, सतीश पाटील, बाळेश नाईक, बी. एस. पाटील आदी उपस्थित होते.

शिक्षक संघातर्फे १२ शिक्षकांना पुरस्कार
गडहिंग्लजला वितरण; निवृत्त शिक्षकांचाही झाला गौरव
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १६ : प्राथमिक शिक्षक संघातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व निवृत्त शिक्षकांचा गौरव असा संयुक्त कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात तालुक्यातील १२ प्राथमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण झाले. संघाचे नेते राजाराम वरुटे अध्यक्षस्थानी होते.
माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र मांडेकर यांनी प्रास्ताविक केले. वरुटे, बाळेश नाईक, संभाजी बापट, जिल्हाध्यक्ष बी. एस. पाटील, सरचिटणीस डी. पी. पाटील, पांडुरंग सुतार, एम. एस. इंगवले, दिलीपकुमार होडगे-पाटील, अजितकुमार मगदूम, समन्वय समितीचे तालुकाध्यक्ष रवळू पाटील यांची भाषणे झाली.
शिवाजी गुरव (भडगाव), अनिल खेपकर (गडहिंग्लज), सुनिल पोटे (वडरगे), शंकर कोले (मुगळी), सुजाता पाटील (नेसरी), सुमन पाटील (दुंडगे), अजितकुमार मगदूम (नौकूड), बाळनाथ अनभुले (हिटणी), आण्णासाहेब देसाई (अत्याळ), गीता भोसले (महागाव), विजय कोळी (हलकर्णी) व मोहन पाटील (डोणेवाडी) यांना आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण झाले. निवृत्त शिक्षक धोंडीबा वांद्रे, एम. एस. इंगवले, दिलीपकुमार होडगे-पाटील, सरला गुरव, शोभा रावण, दुरदुंडी बिरनगड्डी यांच्यासह संघटना प्रतिनिधी आनंद पाटील, बसवराज अंकली, मधुकर जरळी, शिवाजी कोंडुसकर, विकास पाटील यांचाही विशेष सत्कार झाला. तालुका बार असोसिएशन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अ‍ॅड. सतीश तेली, पुरस्काराप्राप्त विलास माळी, रावसाहेब आंबूलकर यांचाही सत्कार झाला. कृष्णा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विठ्ठल देसाई यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com