इचलकरंजीत पाणी पुरवठा विस्कळीत

इचलकरंजीत पाणी पुरवठा विस्कळीत

ich174.jpg
96628
इचलकरंजी ः कृष्णा योजनेच्या जलवाहिनीला शिरढोणजवळ लागलेली गळती काढण्याचे काम सुरु आहे.

इचलकरंजीत पाणी
पुरवठा विस्कळीत

कृष्णा योजनेच्या जलवाहिनीला गळती

इचलकरंजी, ता.१७ ः शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेच्या जलवाहिनीला शिरढोणजवळील लक्ष्मी मंदिरनजिक मोठी गळती लागली आहे. याबाबतची माहिती मिळताच महापालिका प्रशासनाने तातडीने उपसा बंद केला आहे. यासह अन्य तीन ठिकाणी गळती लागली आहे. गळती काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात दोन दिवस शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे.
शहराला कृष्णा नदीतून बहुतांशी पाणी पुरवठा केला जातो. योजनेची उर्वरीत जलवाहिनी कालबाह्य झाली आहे. त्यामुळे मध्यंतरी मजरेवाडी उपसा केंद्रातील एकच पंप सुरु केल्याने पाण्याचा दाब कमी राहिला होता. त्यामुळे गळतीची समस्या तात्पुरती थांबली होती. पण मध्यंतरी दुषीत पाण्यामुळे पंचगंगा नदीतील पाणी उपसा बंद पडला होता. त्यामुळे मजरेवाडी उपसा केंद्रातील दोन्ही पंप सुरु केले होते. परिणामी, पाण्याच्या प्रवाहाचा दाब वाढल्यामुळे पुन्हा गळतीचे संकट निर्माण झाले आहे. शिरढोण येथील लक्ष्मीमंदिर परिसर, टाकवडे हद्द याशिवाय मजरेवाडी उपसा केंद्राजवळ दोन ठिकाणी गळती लागली आहे.
महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून आज व उद्या (मंगळवार) गळती काढण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे कृष्णा नदीतील पाणी उपसा पूर्णतः बंद राहणार आहे. परिणामी, पुढील दोन दिवस शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. गळतीचे काम पूर्ण झाल्यानंतर पूर्वीप्रमाणे पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com