गड-हाळलक्ष्मी यात्रा

गड-हाळलक्ष्मी यात्रा

हाळलक्ष्मी देवीची मंगळवारी यात्रा
गडहिंग्लज : येथील श्री हाळलक्ष्मी देवीची यात्रा मंगळवारी (ता. २५) होणार आहे. परंपरेनुसार अक्षय तृतीयेच्या पहिल्या मंगळवारी ही यात्रा होत आहे. देवस्थान समिती व गणेश मंडळातर्फे यात्रेचे नियोजन केले जात आहे. सोमवारी (ता. २४) सायंकाळी पाचला खातेदार यशवंत पाटील यांच्या वाड्यातून पालखी मिरवणुकीला प्रारंभ होईल. मंगळवारी पहाटे सहाला अभिषेक व पूजा होणार आहे. त्यानंतर सेवेकरी कुंभार समाजातर्फे पुजा बांधली जाणार आहे. दुपारी बाराला पनोरे समाजाचा मानाचा नैवेद्य व आरती झाल्यानंतर महाप्रसादाला प्रारंभ होईल. सायंकाळी वडरगे गावच्या गोसावीनाथांच्या पालखीची गळाभेट होईल. त्यानंतर दोन्ही पालख्या मंदिरात विराजमान होतील. दरम्यान, हाळलक्ष्मी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष किरण कदम यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनासाठी बैठक झाली. उपाध्यक्ष प्रकाश रोटे, सचिव प्रकाश पोवार, खजिनदार यशवंत कोले, गणेश मंडळाचे सदानंद शिंदे, अरुण शिंदे, संदीप रोटे, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र खोराटे, यशवंत कुंभार, अनिल कुंभार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com