दिलबहार , खंडोबा तालीम पुढील फेरीत

दिलबहार , खंडोबा तालीम पुढील फेरीत

लोगो - ‘इंगवले सर’ फुटबॉल स्पर्धा

97161
कोल्हापूर : झुंझार क्लब आयोजित ‘इंगवले सर’ चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीमचा गोलकिपर निखिल खन्ना याने उत्तरेश्वरच्या खेळाडूचा फटका अडवण्यासाठी असा शानदार सूर मारला. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा )


‘दिलबहार’ला पुढे चाल, ‘खंडोबा’चा विजय
सामन्या दरम्यान तणाव; उत्तरेश्‍वर तालीम मंडळ पराभूत
कोल्हापूर, ता. १९ : झुंजार क्लब आयोजित ‘इंगवले सर’ फुटबॉल स्पर्धेमध्ये दिलबहार तालीम मंडळ संघाला सोल्जर ग्रुप विरुद्ध पुढे चाल देण्यात आली, तर खंडोबा तालीमने उत्तरेश्‍वर तालीम मंडळ संघावर टायब्रेकरमध्ये ४ विरुद्ध ३ गोल फरकाने निसटता विजय मिळवला. छत्रपती शाहू स्टेडियम वर स्पर्धा सुरु आहे.
दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध सोल्जर्स ग्रुप यांच्यातील सामना तणावपूर्ण झाला. दोन खेळाडूंमध्ये झालेल्या वादामुळे सामना अर्ध्यावर सोडणाऱ्या सम्राटनगर संघाला बाद ठरवत दिलबहार संघाला पुढे चाल देण्यात आली. सामना ६८ व्या मिनिटापर्यंत नीट चालू होता. दरम्यान, दिलबहारचा खेळाडू व सोल्जर्स ग्रुपचा खेळाडू यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. हा वाद पंचानी मिटवत सामना खेळण्याचे आवाहन केले. मात्र सोल्जर्स ग्रुपतर्फे सामना खेळण्यास नकार देण्यात आला व सर्व खेळाडू मैदानावर बसून राहिले. बराच वेळ उलटून देखील सामना सुरु होत नसल्याने पंच मैदानाबाहेर आले. के.एस.ए.च्या नियमानुसार दिलबहार संघाला विजयी घोषित करण्यात आले. तात्पुरती सोल्जर्सकडून करण रणसिंग याने ५ व्या मिनिटाला, तर दिलबहारकडून जावेद जमादार याने १९ व्या, खुर्शीद सबर अली याने पूर्वार्धाच्या अधिकच्या वेळेत गोल नोंदवत सामन्यात आघाडी घेतली होती.
खंडोबा संघाने उत्तरेश्‍वर संघावर निसटता विजय मिळवला. पूर्वार्धात खंडोबा संघाकडून आक्रमक खेळ झाला. यात चिजोबा याने दिग्विजय असणेकरच्या पासवर ३८ व्या मिनिटाला गोल नोंदवून सामन्यात आघाडी घेतली. उत्तरार्धात उत्तरेश्‍वर संघाकडून अधिक आक्रमक खेळ झाला. यात ७३ व्या मिनिटाला विश्‍वदीप भोसले याने गोल नोंदवून सामना बरोबरीत आणला. 
---------------
टायब्रेकर असा
खंडोबा*उत्तरेश्‍वर      
प्रभू पोवार - अडवला*स्वराज पाटील - गोल
रणवीर जाधव - गोल*अक्षय शिंदे - गोल 
प्रथमेश गावडे - गोल*श्रीकांत माने - गोल
संकेत मेढे - गोल*सत्यजित पाटील - बाहेर मारला 
ऋतुराज संकपाळ - गोल*इंद्रजित शिंदे - गोल खांबावर धडकला 

सामनावीर
संकेत मेढे - खंडोबा तालीम 

लढवय्या 
सोहेल शेख - उत्तरेश्‍वर तालीम

आजचा सामना 
४ वाजता फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ विरुद्ध झुंजार क्लब

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com