इंटेक्स्पो प्रदर्शन उदघाटन

इंटेक्स्पो प्रदर्शन उदघाटन

97679

इंटेक्स्पो प्रदर्शनातून पर्यावरणाचा जागर
जापनीज तंत्रज्ञानातून साकारले ‘टेरेसवर घर’ ः बांबूच्या विविध कलात्मक वस्तूंचेही आकर्षण

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः तुमच्या घरावरील टेरेस तयार आहे, आणखी खोल्या वाढवायच्या आहेत तर जापनीज तंत्रज्ञानाच्या मदतीने अवघ्या काही तासांत तुमचे घर उभारले जाईल. नैसर्गिकरित्या बनलेली काष्ठशिल्प, लाकडाच्या बुंद्यापासून तयार केलेली कार्डहोल्डर, कुजलेल्या लाकडावर प्रक्रिया करून त्यापासून तयार केलेले शोपीस, नैसर्गिक आकाराचे डायनिंग टेबल आणि पर्यावरणपूरक असलेले शाश्वत टेरामिक्सचे सोपकेस, ट्रे, ज्वेलरी होल्डर, कँडल होल्डर आणि भिंतही अशा पर्यावरणपूरक घरसजावटीच्या वस्तूंनी इंडियनन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डीझायनर्स तर्फे आयोजित इंटेक्स्पो प्रदर्शन सजले आहे. यानिमित्ताने पर्यावरणाचा जागरच या इंटिरियर डिझायनर्सनी केला आहे.
हॉटेल पॅव्हेलियनमध्ये आज कोल्हापूर रिजनल चॅप्टरतर्फे आयोजित ‘इंटेक्स्पो’ प्रदर्शनाचे........................ यांच्या हस्ते उदघाटन झाले. हे प्रदर्शन सोमवार (ता. २४) पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनात बांबुपासून बनविलेल्या विविध सजावटींच्या वस्तूंसह बांबूघर ही संकल्पनाही साकारली आहे. बदलत्या हवामानात क्रॉंक्रीटच्या बांधकामापेक्षा पर्यावरणपूरक असलेल्या बांबूपासूनचे घर फायदेशीर ठरते. तसेच या घरांमध्ये बांबूच्या खुर्च्या, टेबल, चटई, डायनिंग टेबल अशा दैनंदिन वापराच्या वस्तूही प्रदर्शनासाठी ठेवल्या आहेत. त्यामुळे बांबूपासूनच्या सजावटीचा एक नवा पर्याय येथे ग्राहकांना मिळाला आहे. त्याबरोबरच गार्डनच्या लँडस्केपिंगपासून गार्डनिंगसाठी लागणाऱ्या विविध वस्तूही एकाच छताखाली मिळणार आहेत. यामध्ये कुंड्यांचे नानाविध प्रकार, विविध अवजारे, गार्डन सजावटीच्या वस्तूंचा समावेश आहे. घर म्हटले की स्वयंपाकघर आलेच. या स्वयंपाकघराचा वापर सुलभ व्हावा, यासाठी विविध इंटिरियर डिझायनर्सने सुलभ अशा स्वयंपाकघरांचा सेट उभा केला आहे. त्यासोबतच खिडक्यांचे नानाविध प्रकार, कलात्मक घड्याळे, कर्टन्स, सोफा सेट, प्लायवुडच्या कलात्मक वस्तू, वॉल, पेंटीग्ज आणि नानाविध सजावटींच्या वस्तूंनी हे प्रदर्शन सजले असून, घर सजावटीच्या नानाविध प्रकारांसाठी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनर्सतर्फे करण्यात आले आहे. यावेळी कोल्हापूर रिजनल चाप्टरचे अध्यक्ष चंदन मिरजकर, सचिव गौरव काकडे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com