टोप तणाव राजाराम

टोप तणाव राजाराम

टोप केंद्रावर शब्दिक चकमक
कोल्हापूर, ता. २३ : आधारकार्डवर बनावट पत्ता दाखवून मतदान करणारे लोक स्थानिकचे नसुन येलूरचे आहेत, त्यांच्या ओळखपत्राची पडताळणी करुन घ्यावी, असा आक्षेप आमदार सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतला. या मतदारांची यादीत नावे आहेत, त्यांना मतदान करु द्यावे, असे म्हणत महादेवराव महाडिक यांच्या गटातर्फे कारखान्याचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी संबंधित उमेदवारांचे समर्थन केल्याने टोप (ता. हातकणंगले) येथील मतदान केंद्रावर प्रचंड गोंधळ झाला. यामुळे, पंधरा ते वीस मिनिटे मतदान प्रक्रिया रखडली. दरम्यान, सायंकाळी याच मतदान केंद्रावर बनावट मतदान करणाऱ्या एका व्यक्तिला आमदार सतेज पाटील गटाने पकडून दिल्याने कायकर्ते पुन्हा संतप्त झाले. त्यामुळे पोलीसांसह निवडणूक अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.
सकाळी दहाच्या सुमारास काही लोक बनावट आधारकार्ड घेवून मतदानाला आल्याचे सतेज पाटील गटाचे दिलीप पाटील आणि मुकुंद पाटील यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी हा आक्षेप चुकीचा आहे. यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे सांगत मतदान आलेल्या लोकांना मतदान करु द्यावे, असा पवित्रा घेतल्याने मतदान केंद्रावर गोंधळ उडाला. दरम्यान, कारखान्याचे सहाय्य निवडणूक निर्णय अधिकारी प्रदिप मालगावे यांनी तत्काळ धाव घेवून मतदार यादीत असणाऱ्या मतदारांना मतदान करण्याचा अधिकार आहे. न्यायालयाने त्यांना मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यामुळे यावर आक्षेप घेता येणार नाही, असे सांगितल्यानंतर संबंधित व्यक्तींना मतदान करता आले. त्यानंतर दिवसभर या मतदान केंद्रावर तणाव कायम राहिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com