बसची काच फुटली

बसची काच फुटली

98391
उन्हाच्या तडाख्याने
फुटली बसची काच
कोल्हापूर ः उन्हाचा तडाखा किती प्रचंड आहे हे दाखवणारी घटना आज दुपारी महाराणा प्रताप चौकात झाली. भरदुपारी एका थांबलेल्या केएमटी बसच्या खिडकीची काच फुटली. अचानक फुटलेल्या काचेमुळे प्रवाशी व कर्मचाऱ्यांमध्ये उन्हाची चर्चा सुरू होती. आज दुपारी त्या बसमधून प्रवासी उतरल्यानंतर ती महाराणा प्रताप चौकातील थांब्यावर थांबली होती. अडीचच्या सुमारास त्या बसच्या एका खिडकीची काच फुटली व तुकडे रस्त्यावर पडले. तिथे थांबलेले प्रवासी, चालक, वाहक व नियंत्रक या आवाजाने जमा झाले. काही कारण नसताना अचानक काच फुटल्याने सर्वजण आश्चर्य व्यक्त करत होते. बसमध्ये तसेच बसजवळ कोणी नव्हते यामुळे इजा झाली नाही. उन्हात फिरत असताना काचेतील छिद्रात उष्ण हवा जाऊन काच फुटली असावी, असे तेथील एका बस चालकाने सांगितले. अशा प्रकारे वाहनांच्या अचानक काचा फुटतात, असेही त्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com