बार असो दुरंगी लढत स्पष्ट

बार असो दुरंगी लढत स्पष्ट

जिल्हा बार असोसिएशनसाठी दुरंगी लढत
माघारीनंतर चित्र स्पष्ट; पंधरा जागांसाठी ३० रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीत दुरंगी लढत होणार असल्याचे आज माघारीच्या अखेरच्या दिवशी स्पष्ट झाले. १५ जागांसाठी एकूण ३० जण रिंगणात राहिले आहेत. प्रमुख पदासाठी असलेल्या जागांसाठी आज दोघांनी तीन ठिकाणांहून माघार घेतली. त्यामुळे ॲड. प्रशांत देसाई आणि ॲड. सर्जेराव खोत यांच्या पॅनेलमध्ये दुरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
माघारीच्या आजच्या अखेरच्या दिवशी अध्यक्षपदासाठी असलेले ॲड. गिरीश नाईक यांनी माघार घेतल्यामुळे खोत आणि देसाई हे दोघेच रिंगणात राहिले आहेत. तसेच उपाध्यक्ष आणि सचिव पदासाठी रणजित घाटगे यांनी दोन्ही गटातून माघार घेतल्यामुळे तेथेही आता दुहेरी लढत होणार आहे. उपाध्यक्ष पदासाठी ॲड. विजयसिंह पाटील आणि ॲड. विल्सन नाथन यांच्यात लढत होणार आहे. सचिव पदासाठी ॲड. तेजगोंडा पाटील आणि ॲड. चेतन शिंदे यांच्यात लढत होईल. त्याच सोबत सहसचिव, लोकल ऑडिटर, महिला प्रतिनिधी या प्रत्येक एका जागेसाठी दोघे रिंगणात आहेत. तसेच कार्यकारणी सदस्याच्या नऊ जागांसाठी अठरा उमेदवार रिंगणात आहेत. २८१८ मतदार असून, त्यांच्याकडून १५ जणांची निवड होणार आहे. २९ एप्रिलला मतदान आणि त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. शिवराम जोशी काम पाहत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com