गड-क्रिकेट लीग

गड-क्रिकेट लीग

फोटो क्रमांक : gad२६४.jpg
98664
गडहिंग्लज : स्वामी विवेकानंद क्रिकेट लीग विजेत्या डीके वॉरियर्स व एसएस फायटरला पारितोषिक देऊन गौरविले.
------------------------------
डीके वॉरियर्सला विजेतेपद
स्वामी विवेकानंद क्रिकेट लीग : एसएस फायटर उपविजेता

गडहिंग्लज, ता. २६ : येथील स्वामी विवेकानंद क्रिकेट लीगचे डीके वॉरियर्सने विजेतेपद पटकाविले. चुरशीच्या अंतिम सामन्यात त्यांनी एसएस फायटरला नमविले. स्वामी विवेकानंद स्पोर्टस् मंडळातर्फे गडहिंग्लज हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा झाली. रोहित ताशिलदार मालिकावीरासह उत्कृष्ट फलंदाज ठरला.
गेले आठ दिवस स्वामी विवेकानंद क्रिकेट लीग सुरू होती. आज सकाळी डीके वॉरियर्स व एसएस फायटर यांच्यात अंतिम सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना एसएस फायटरने १० षटकांत आठ गडी गमावत ५४ धावा केल्या. राकेश कदमने १४ चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांसह २४ धावांची खेळी केली. अन्य फलंदाजांनी निराशा केली. श्रीनाथ सुतार व अमित मेंडूले यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल डीके वॉरियर्सने नऊ षटकांत सात गडी गमावून लक्ष्य पार केले. सलामीवीर संदीप खवरे (१८) व रोहित ताशिलदार (१७) यांनी विजयाची पायाभरणी केली. बाबू तेलवेकरने हॅट्ट्रिकसह चार बळी घेतले.
विजेत्या व उपविजेत्या संघाला राजेश कोलते, संतोष दड्डी, सिद्धार्त गाताडे, नितीन मोहिते, विनायक कंगुरे, अमर मोर्ती, कैलास शिंत्रे, संकेत बेल्लद यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. रोहित ताशिलदार, आकाश खोत, प्रवीण तेलवेकर यांनी वैयक्तिक बक्षीसे पटकाविली. युवराज वाघ, राजू मोहिते, शुभम गाडेकर यांनी पंच म्हणून काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com