धनसंपदा पतसंस्थेला विक्रमी  १ कोटी ४४ लाखांचा नफा

धनसंपदा पतसंस्थेला विक्रमी १ कोटी ४४ लाखांचा नफा

gad285.jpg :
99152
उदय जोशी
-----------------------------------------
धनसंपदा पतसंस्थेला
१ कोटी ४४ लाखांचा नफा
गडहिंग्लज, ता. २८ : येथील धनसंपदा नागरी सहकारी पतसंस्थेला मार्च २०२३ अखेर विक्रमी १ कोटी ४४ लाख ८० हजाराचा नफा झाल्याची माहिती अध्यक्ष उदय जोशी यांनी दिली. सर्व तरतुदी करुन ६६ लाख ४५ हजार २१६ रुपयांचा संस्थेला निव्वळ नफा झाल्याचेही ते म्हणाले.
ते म्हणाले, ‘संस्थेचे एकूण वसूल भागभांडवल १ कोटी ९२ लाखाचे आहे. राखीव व इतर सर्व निधी ६ कोटी ४० लाखांचे आहे. संस्थेकडे ५१ कोटी २ लाखाच्या ठेवी असून ३२ कोटी २२ लाखांची कर्जे आहेत. संस्थेने तरते भांडवल म्हणून २७ कोटी ३१ लाखाची गुंतवणूक केली आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल १६३ कोटी ८ लाखाची झाली आहे. संस्थेने यंदाही सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे.’ संस्थेचे निव्वळ एनपीए शून्य टक्के आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी उपाध्यक्ष, सर्व संचालक, व्यवस्थापक व कर्मचाऱ्‍यांचे सहकार्य मिळत असल्याचेही श्री. जोशी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com