डॉ. आंबेडकरांना कृतिशील अभिवादन

डॉ. आंबेडकरांना कृतिशील अभिवादन

99647
गडहिंग्लज : राजे फाउंडेशनतर्फे आयोजित शिबीरासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसोबत समरजित घाटगे, भाऊसाहेब कांबळे व इतर उपस्थित होते.

डॉ. आंबेडकरांना कृतिशील अभिवादन
समरजित घाटगे; राजे फाउंडेशनतर्फे जाती दाखल्यांसाठी शिबीर
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३० : दलित बांधवांना जातीचे दाखले सुलभ पद्धतीने मिळावेत म्हणून राजे फाउंडेशनतर्फे मोफत जातीचे दाखले काढून देण्याच्या शिबीराच्या आयोजनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कृतीशील अभिवादन केल्याचे समाधान आहे, असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले.
येथील पालिकेच्या सभागृहात डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राजे फाउंडेशनतर्फे मोफत जातीचे दाखले काढून देण्याच्या उपक्रमांतर्गत या कँपचे आयोजन केले होते. त्यास दलित समाजातील नागरिक व विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला.
घाटगे म्हणाले, ‘‘जातीचा दाखला शिक्षण, कर्ज, नोकरी, शासकीय अनुदान, घरकुल मंजुरी अशा अनेक बाबींसाठी आवश्यक असतो. सर्वांनाच हे दाखले वेळेत काढता येत नाहीत. शिवाय अनेक फेर्‍याही माराव्या लागतात. त्यासाठी वेळ पैसेही खर्च होतात. त्याचा विचार करून समाजबांधवांसाठी हा उपक्रम घेतला.’’ या वेळी प्रकाश पाटील, विठ्ठल पाटील, सरपंच अनूप पाटील, शैलेंद्र कावणेकर, शहाजी पाटील, राजे बँकेचे संचालक रवींद्र घोरपडे, दिगंबर विटेकरी, भीमराव कोमारे, वामन बिलावर, ‘शाहू’चे संचालक भाऊसाहेब कांबळे, आनंदा बल्लाळ, उमेश सावंत, सचिन बल्लाळ, अक्षय घस्ते आदी उपस्थित होते. रमेश कांबळे यांनी स्वागत केले. लखन हेगडे यांनी आभार मानले.
-----------
चौकट...
ऋणानुबंधांना उजाळा
राजर्षी शाहू महाराज व डॉ. आंबेडकर यांच्यात जातीभेदापलिकडचे ऋणानुबंध होते. महाराजांनी डॉ. आंबेडकर यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली होती. आता या घराण्याचे वंशज घाटगे यांच्या संकल्पनेतून समाजबांधवांसाठी दाखले काढून देण्याच्या मोफत शिबीराचे आयोजन करून या ऋणानुबंधांना उजाळा दिल्याची भावना समाजबांधवांनी व्यक्त केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com