बाबासाहेब खंजीरे यांच्यामुळे इचलकरंजी औद्योगिक शहर

बाबासाहेब खंजीरे यांच्यामुळे इचलकरंजी औद्योगिक शहर

ich305.jpg
99541
इचलकरंजी ः देशभक्त बाबासाहेब खंजीरे जन्म शताब्दी सोहळ्याचे उद्‍घाटन माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याहस्ते झाले. राहूल खंजीरे, अशोक स्वामी, मदन कारंडे आदी उपस्थित होते.

बाबासाहेब खंजीरे यांच्यामुळे
इचलकरंजी औद्योगिक शहर

कल्लाप्पाण्णा आवाडे ः जन्मशताब्दी सोहळ्यास प्रारंभ

इचलकरंजी, ता. ३० ः इचलकरंजी शहराला औद्योगिक शहर म्हणून स्थापित करण्याचे कार्य देशभक्त बाबासाहेब खंजीरे यांनी केले आहे. आजचा इचलकरंजी शहराचा औद्योगिक शहर हा चेहरा त्यांच्यामुळेच प्राप्त झाला आहे. अशा या एका कृतिशील सेवाव्रतीच्या जन्मशताब्दी सोहळ्यास उपस्थित राहण्याचे मला भाग्य मिळाले, असे प्रतिपादन माजी खासदार कल्लाप्पाणा आवाडे यांनी केले.
येथील जयहिंद मंडळ क्रीडांगणावर आयोजित देशभक्त बाबासाहेब खंजीरे जन्मशताब्दी सोहळयाला दीपप्रज्वलनाने प्रारंभ झाला. यावेळी उद्‍घाटक म्हणून ते बोलत होते. जन्मशताब्दी सोहळा समितीतर्फे घेतलेल्या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थीत होते. अशोक स्वामी म्हणाले, ‘तत्कालीन कामगार संपामुळे इचलकरंजीतील औद्योगिक क्षेत्र संकटात आले. कामगार आणि मालक यांच्यातील कटुता व संघर्ष टोकाला गेला. अशा परिस्थीतीत बाबासाहेब खंजीरे यांनी पुढाकार घेतल्यानेच इचलकरंजी शांत राहिली. त्यामुळे त्यांना इचलकरंजीच्या औद्योगिक शांततेचा आद्य पुरस्कर्ता मानले जाते.’
मदन कारंडे, सतीश डाळ्या, संजय कांबळे, रवींद्र माने, सयाजी चव्हाण, रवी रजपुते, विठ्ठल चोपडे, अमरजित जाधव, संजय केंगार, अमित गाताडे, श्रीनिवास बोहरा, प्रकाश दत्तवाडे, प्रकाश सातपुते, सदा मलाबादे, चंद्रकांत पाटील, दत्ता माने, सतीश कोष्टी आदी उपस्थीत होते. कार्यवाह शामराव कुलकर्णी यांनी स्वागत करतांना जन्मशताब्दी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. प्रास्ताविक कार्याध्यक्ष राहुल खंजीरे यांनी केले. आभार स्वागताध्यक्ष शशांक बावचकर यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com