पाणी बंद आज

पाणी बंद आज

ए, बी, ई वॉर्डमधील
काही भागात
आज पाणी बंद

कोल्हापूर : पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रातील चेंबरची गळती दुरुस्तीमुळे उद्या (ता. १) ए, बी व ई वॉर्डमधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मंगळवारीही (ता. २) अपुरा व कमी दाबाने पाणी मिळणार आहे.
शिंगणापूर उपसा केंद्रावरून, पुईखडी जल शुद्धीकरण केंद्रावरून ए, बी वॉर्डमध्ये मंगळवार पेठ, शिवाजी पेठ याबरोबरच इतर परिसरातील होणारा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे. त्याचबरोबर ई वॉर्डमधील राजारामपुरी, शाहूपुरी तसेच शिवाजी पार्क, रुईकर कॉलनी, वैभव सोसायटी, लिशा हॉटेल परिसर, महाडिक वसाहत भागातही पुरवठा होणार नाही. त्यामुळे पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com