खाडे मागणी

खाडे मागणी

00077

लोकसभेची उमेदवारी
बाजीराव खाडेंना द्या

कार्यकर्त्यांचे आमदार पी. एन. पाटील यांना निवेदन

कोल्हापूर, ता. ३ ः कोल्हापूर लोकसभा मतदार संघ काँग्रेसकडे घेण्याबरोबरच या मतदार संघातून राष्ट्रीय सरचिटणीस बाजीराव खाडे यांना उमेदवारी द्यावी, या मागणीचे निवेदन सांगरूळसह परिसरातील कार्यकर्त्यांनी आमदार पी. एन. पाटील यांना दिले.
कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील तीन विधानसभा व दोन विधान परिषद आमदार काँग्रेसचे आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांतही काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे, म्हणूनच कोल्हापूर लोकसभेची जागा काँग्रेसकडे मिळावी, यासाठी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरावा. त्याचबरोबर सांगरूळचे काँग्रेस नेते बाजीराव खाडे यांनी कोल्हापूर लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी मागणी पंचक्रोशीतील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत केली आहे. खाडे गेली २५ वर्षे अखंडपणे गावपातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत पक्षाचे काम निष्ठेने करत असून, परिसरातील सहकारी चळवळीतही त्यांचे काम उल्लेखनीय आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून खाडे यांना कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसची उमेदवारी मिळावी, यासाठी आपण पाठबळ द्यावे, अशी मागणी या निवेदनात केली आहे.
निवेदनावर कुंभी बँकेचे माजी संचालक निवृत्ती चाबूक, ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, सांगरूळच्या सरपंच शीतल खाडे, माजी पंचायत समिती सदस्या अर्चना खाडे, उपसरपंच सुभाष सुतार, माजी सभापती सीमा चाबूक, अनिता जंगम आदींची स्वाक्षरी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com