यंत्रमाग कामगार मजुरीवाढ वाद

यंत्रमाग कामगार मजुरीवाढ वाद

00394
इचलकरंजी : सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना पॉवरलूम विव्हर्स असोसिएशनतर्फे निवेदन देण्यात आले.

मजुरीवाढप्रश्‍नी अपर आयुक्तांसह बैठक
जानकी भोईटे; पॉवरलूम असोसिएशनचा एकतर्फी मजुरीवाढीस विरोध कायम
ट्रेडिंगधारकाकडून यंत्रमागधारकांना मजूरी वाढ मिळत नाही. तोपर्यंत यंत्रमागधारक कामगारांना मजूरीवाढ देणार नाहीत
इचलकरंजी, ता. ३ : यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढप्रश्‍नी अपर कामगार आयुक्तांबरोबर बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्‍वासन सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी दिले. इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशनतर्फे शिष्टमंडळाने त्यांना निवेदन देवून एकतर्फी मजुरीवाढीस विरोध नोंदविला. ट्रेडिंगधारकाकडून यंत्रमागधारकांना मजूरी वाढ मिळत नाही. तोपर्यंत यंत्रमागधारक कामगारांना मजूरीवाढ देणार नाहीत, असे या वेळी अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
इचलकरंजी केंद्रामध्ये दरवर्षी यंत्रमाग कामगारांची मजूरी वाढ घोषीत होते. यामुळे येथील उत्पादन खर्च इतर केंद्राच्या तुलनेत वाढत आहे. त्यामुळे इचलकरंजीतील कापडाला बाहेरील बाजारपेठेतून मागणी कमी झालेली आहे. या सर्वांचा परिपाक म्हणून येथील उद्योग चालू ठेवणे मुश्‍कील झालेले आहे. यंत्रमाग उद्योगातील भयानक मंदी, वारंवार सुताचे बदलते दर, सुट्या भागांची दरवाढ, वीजेच्या दरामध्ये झालेली भरमसाठ वाढ या कारणांमुळे अडचणीत असलेल्या या उद्योगास दरवर्षी मजूरीवाढ देणे अशक्य बनल्याने तसेच ट्रेडिंग असोसिएशनने खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना गेल्या १० वर्षात कोणतीही मजूरीमध्ये वाढ न केल्यामुळे गेल्या सहा वर्षांपासून आम्ही या करारतून बाहेर पडलो आहोत, असे पाटील यांनी या वेळी नमूद केले. या वेळी कामगार अधिकारी राहुल तोडकर व महेश हेंद्रे उपस्थित होते. शिष्टमंडळात उपाध्यक्ष रफिक खानापूरे, संचालक चंद्रकांत भोपळे, सुभाष बलवान, किरण पोवार, मिलींद बिडकर उपस्थित होते.
---------
कोट
अप्पर कामगार आयुक्तांच्याबरोबर बैठक होऊन जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत यंत्रमागधारकांनी कामगारांना मजूरीवाढ देऊ नये.
- चंद्रकांत पाटील, अध्यक्ष, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन
------
सहाय्यक कामगार आयुक्तांनी दहा पैसे मुजरीवाढ केली आहे. त्यानुसार यंत्रमाग कामगारांनी उद्या (ता. ४) वाढीव दराने मजुरी घ्यावी.
- कामगार संघटना कृती समिती
-------
शनिवारी कामगारांचा मेळावा
कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे ६ मे रोजी सकाळी १० वाजता समाजवादी प्रबोधिनी येथे यंत्रमाग कामगारांचा मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्यास उपस्थित राहण्यासह मजुरीवाढ न देणाऱ्या मालकाच्या विरोधात तक्रार करण्याचे आवाहन आज झालेल्या कृती समितीच्या बैठकीत करण्यात आले. बैठकीस भरमा कांबळे, सुभाष कांबळे, हणमंत लोहार, राजेंद्र निकम, आनंदा गुरव, सुनिल बारवाडे, जमाल नदाफ आदी उपस्थीत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com