महालक्ष्मीला चांदीची पालखी

महालक्ष्मीला चांदीची पालखी

फोटो क्रमांक : gad५१.jpg

00626
कोल्हापूर : श्री महालक्ष्मी देवीची चांदीची पालखी शास्त्रोक्त पूजनानंतर गडहिंग्लजला रवाना झाली. यावेळी शिवराज नायकवडी, रमेश रिंगणे, सूर्यकांत पाटील उपस्थित होते.
--------------------------------------------------

महालक्ष्मीला ३७ किलो चांदीची पालखी
सोमवारी नगरप्रदक्षिणा; गडहिंग्लजला पुरणपोळी-आमरसचा महाप्रसाद

गडहिंग्लज, ता. ५ : येथील श्री महालक्ष्मी देवीस श्री महालक्ष्मी यात्रा कमिटीने लोकवर्गणीतून ३७ किलोची चांदीची पालखी तयार केली आहे. अंबाबाई मंदिराच्या सुवर्ण पालखीचे कारागीर गणेश चव्हाण-सातारकर (उद्यमनगर, कोल्हापूर) यांनी ही पालखी बनविली आहे.
दरम्यान, कोल्हापुरात प.पू. वेदमुर्ती सुरेश हिरेमठ यांच्याहस्ते पालखीचे शास्त्रोक्त पूजन होऊन गडहिंग्लजमध्ये दाखल झाली आहे. सोमवारी (ता. ८) दुपारी ४ वाजता हिरण्यकेशी नदी घाटावरून सुवासिनींची कलश मिरवणूक निघेल. श्री शिवलिंगेश्‍वर महास्वामी, श्री गुरुसिद्धेश्‍वर स्वामी, श्री भगवानगिरी महाराज, श्री आनंद महाराज गोसावी, आमदार विनय कोरे, आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत पालखीचे पूजन झाल्यानंतर वाद्यांच्या गजरात नगरप्रदक्षिणा होईल.
कोल्हापुरातील कार्यक्रमात यात्रा समितीचे अध्यक्ष रमेश रिंगणे यानी स्वागत तर बसवराज आजरी यांनी प्रास्ताविक केले. सचिव चंद्रकांत सावंत यांनी आभार मानले. कार्यक्रमास सूर्यकांत पाटील-बुदिहाळकर, बाळूमामा संस्थानचे प्रशासक, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी, व्यवस्थापक महादेव दिंडे, प्रा. जयंत पाटील, शेखर आजरी, अजित आजरी, जितेंद्र पाटील, वैभव सावर्डेकर, राजेंद्र लकडे, प्रशांत देसाई, रवींद्र साळोखे, अविनाश नाशिपुडे, बसवराज संकेश्वरी, यात्रा समितीचे उपाध्यक्ष विठ्ठल भमानगोळ यांच्यासह समितीचे सदस्य, कुंभार समाजबांधव, हक्कदार, मानकरी उपस्थित होते.

चौकट...
* पुरणपोळी दुरड्यांचे आवाहन
पालखीची नगरप्रदक्षिणा झाल्यानंतर सोमवारी रात्री नऊ वाजता गावासाठी पुरणपोळी व आमरसचा महाप्रसाद आहे. त्यासाठी महिलांनी पुरणपोळीच्या दुरड्या घेऊन महालक्ष्मी मंदिरात उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. रिगणे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com