गोवा महोत्सव

गोवा महोत्सव

गोव्याचा ‘कुडचडे’ महोत्सव आजपासून
कोल्हापूर, ता. ५ ः गोव्यात लोकप्रिय ठरलेला असा कुडचडेचा चंदेरी महोत्सव यंदापासून गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या ५० व्या पुण्यतिथी वर्ष निमित्त कार्यक्रमाचा एक भाग म्हणून येथे ६ ते ८ मे दरम्यान रंकाळा चौपाटी खराडे कॉलेज मैदानवर खास उभारण्यात येणाऱ्या रंगमंचावर होणार आहे, अशी माहिती दयानंद कला केंद्रचे अध्यक्ष मोर्तु नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नाईक म्हणाले, ‘उदघाटन उद्या (ता. ६) सायंकाळी ६ वाजता उद्योजक दीपक मगर यांच्या हस्ते व भंडारी समाजचे अध्यक्ष व दयानंद कला केंद्रचे उपाध्यक्ष अशोक नाईक भंडारी यांची उपस्थितीत होणार आहे. माजी महापौर सई खराडे यांची उपस्थिती असेल.कुडचडे-सावर्डे ही शहरे गोव्याच्या संस्कृतीची केंद्रबिंदू आहेत. ह्या शहराभोवताली अनेक पर्यटन स्थळे, राजकीय, समाजिक स्वातंत्र्य सेनानी, राष्ट्रीय स्तरावरील साहित्यिक कलाकाराची ही भूमी आहे. हा इतिहास सदर महोत्सवात लोकांसमोर प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने केंद्राने हा उपक्रम हाती घेतला आहे.’
पहिल्या दिवशी गोवा दर्शन, कला संगम म्हार्दोळतर्फे लोककला कार्यक्रम व कोंकणी नाट्य प्रवेश, दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय स्तरावर नैपुण्य मिळविलेल्या गोमंतकीय गायक वादक संगितकाराचा गझल कार्यक्रम, नवाब शेख वास्को यांची मराठी गिते, तर तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र दर्शन हा मराठी संस्कृतीवर आधारित कार्यक्रम होणार आहे. बहुभाषिक विनोदी काव्य ''हास्य कल्लोळ'', ''रायगडाला जेव्हा जाग येते '' ह्या नाटकातील एक प्रसंग कुडचडे- सावर्डे भागातील नाट्यकलाकार सादर करणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. दयानंद कला केंद्रचे उपाध्यक्ष सुभाष नाईक, बंटी उडेलकर, कोषाध्यक्ष नवीन खांडेकर, सचिव गोविंद गावडे, महिला विभाग प्रमुख आनंदी नाईक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com