ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांचा ‘शिव जीवनगौरव’ ने सन्मान

ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांचा ‘शिव जीवनगौरव’ ने सन्मान

फोटो-00777
...........

डॉ. आ. ह. साळुंखे यांचा
‘शिव जीवनगौरव’ ने सन्मान


कोल्हापूर, ता.५ ः शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात शिवमहोत्सव झाला. त्यामध्ये ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना शिव जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार होते. मात्र, प्रकृती अस्वस्थतेमुळे ते या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नव्हते. त्यांनी उपस्थितांशी ऑनलाईन संवाद साधला. कोल्हापुरात नालंदा अकादमी आणि लोकायत प्रकाशन संस्थेतर्फे आयोजित ‘ सत्य असत्यशी मन केले ग्वाही’ या पुस्तकावरील चर्चासत्रात रविवारी आजी-माजी विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष डॉ. प्रविण कोडोलीकर आणि सरोज बिडकर यांच्या हस्ते डॉ. साळुंखे यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. मानपत्र, ग्रंथभेट असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी डॉ. हरि नरके, राजन गवस, रणधीर शिंदे, नंदकुमार मोरे, राकेश साळुंखे, अमर कांबळे, अमित मेधावी, प्रशांत गायकवाड, मंदार पाटील, मंजित माने, महेश राठोड, नितीन पाटील, अजिंक्य शिंदे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com