गड-हत्ती नुकसान

गड-हत्ती नुकसान

00779

चिंचेवाडी : हत्तीने शेतातील उलथवून टाकलेली पाण्याची टाकी. दुसऱ्या छायाचित्रात आंब्याच्या झाडाचे केलेले नुकसान. (अमर डोमणे : सकाळ छायाचित्रसेवा)
--------


हत्तीचा मोर्चा चिंचेवाडीकडे;
आंबा, फणसाचे नुकसान


गडहिंग्लज, ता. ५ : दोन दिवसांपूर्वी नौकूडमध्ये आलेल्या हत्तीने आपला मोर्चा चिंचेवाडीकडे वळविला आहे. बाळासाहेब गुरव यांच्या चिंचेवाडी हद्दीतील शेतातील आंबा व फणसाच्या झाडांचे नुकसान केले. तसेच पाण्याची टाकी व पाईपलाईनही फोडली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.
गतआठवड्यात हत्तीने थेट लिंगनूर कसबा नेसरी व दुगुनवाडी गावात प्रवेश केला होता. गावातून फेरफटका मारून गेलेला हा हत्ती आठ दिवस नजरेस पडला नव्हता. पण, दोन दिवसांपूर्वी त्याने नौकूड परिसरात दर्शन दिले. हसुरसासगिरी रोड व हलकर्णी रोडवरील शेतातील पिकांचे नुकसान केले होते. दरम्यान, आज त्याने चिंचेवाडीकडे आपला मोर्चा वळविला. बाळासाहेब गुरव यांच्या शेतातील १० फणस व १३ आंब्याच्या झाडांचे नुकसान केले. तसेच पाण्याची टाकीही उलथवून टाकली आहे. तसेच पाईपलाईन फोडली आहे.
वनरक्षक रणजित पाटील व वनपाल पी. जी. वारंग यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी नुकसानीचा पंचनामा केला. दरम्यान, हत्तीच्या पायाचे ठसे आढळले आहेत. त्यावरुन हसुरवाडीच्या जंगलाकडे हत्ती गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com