पानसरे खटला सुनावणी बातमी

पानसरे खटला सुनावणी बातमी

पानसरे यांचा एक्सरे,
केसपेपर न्यायालयात सादर

कोल्हापूर, ता. ६ ः ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खून खटल्याच्या सुनावणीत आज पानसरे यांचा एक्सरे व इतर वैद्यकीय कादगपत्रांचा १२४ पानांचा अहवाल सादर केला. जिल्हा सत्र न्यायाधीश एस.एस.तिबिले यांच्यासमोर आज सुनावणी झाली. पंच साक्षीदार सय्यद पटेल यांची साक्ष आणि उलट तपासणी झाली. सरकारी पक्षाकडून ॲड.शिवाजी राणे यांनी युक्तिवाद केला.
आरोपींच्या बाजूने सात वकिलांनी आपले म्हणणे मांडले. पुढील सुनावणी २० मे ला होणार आहे. बचाव पक्षाच्या वतीने सात वकिलांनी पटेल यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. सुनावणीसाठी सर्व संशयित आरोपींना पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले होते. उद्या त्यांची रवानगी कर्नाटकातील कारागृहात होणार आहे. ॲड. समीर पटवर्धन, ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर, ॲड. प्रीती पाटील, ॲड. अमोघवर्ष खेमलापुरे, ॲड. डी. एम. लटके, ॲड. ए. जी. बडवे आणि ॲड. प्रवीण करोशी या सात वकिलांनी पंच साक्षीदार पटेल यांची उलट तपासणी घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com