जमीन उपलब्ध झाल्यास प्रकल्प आणू; पालकमंत्री दीपक केसरकर

जमीन उपलब्ध झाल्यास प्रकल्प आणू; पालकमंत्री दीपक केसरकर

01103
आजरा : येथे पोलिस ठाण्याच्या इमारतीच्या उद्‍घाटन कार्यक्रमात बोलतांना पालकमंत्री दीपक केसरकर. या वेळी आमदार प्रकाश आबिटकर, कोल्हापुर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सूनिल फुलारी, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, अशोक चराटी, जयवंतराव शिंपी, तहसीलदार समीर माने व मान्यवर उपस्थित होते.

जमीन उपलब्ध झाल्यास प्रकल्प आणू
पालकमंत्री दीपक केसरकर; आजरा पोलिस ठाण्याच्या इमारतीचे उद्‍घाटन
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ७ : कोल्हापूर जिल्ह्याला विकासात न्याय दिला जाईल. देशात जयपुरमधील पर्यटनाचे जसे नाव आहे. त्याचधर्तीवर येत्या वर्षभरात कोल्हापुरच्या पर्य़टनाचा विकास केला जाईल. आजरा व सिंधुदुर्ग सीमेवर तीनशे एकर जमीन उपलब्ध झाल्यास विकासाचा मोठा प्रकल्प आणू. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असे शालेय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
येथील पोलिस ठाण्याच्या नुतन इमारतीचे उद्‍घाटन केसरकर यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. कोल्हापूर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी अध्यक्षस्थानी होते. या वेळी आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, अशोक चराटी, जयवंतराव शिंपी, तहसीलदार समीर माने, उपनगराध्यक्षा अस्मिता जाधव, जनार्दन टोपले, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रविंद्र जाधव प्रमुख उपस्थित होते.
केसरकर म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा कोल्हापुरला सॉफ्ट कॉर्नर आहे. त्यामुळे येथील विकासकामे गतीने होत आहेत. पुढेही या जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करू. येथील आमदार आबिटकर हे क्रियाशील आहेत. आजरा पोलिस ठाण्याचे अधिकारी सर्वसामान्यांना न्याय देतील.’’
आमदार आबिटकर म्हणाले, ‘‘दोन कोटी आठ लाखांची सुसज्ज इमारत उभारून भौतिक सेवा सुविधा पुरवल्या आहेत. यामुळे पोलिस अधिकारी व अमलदारांना समाधानकारक काम करण्यास मिळणार आहे. लोकांना न्याय मिळेल. पोलिस प्रशासनाकडून लोकहित व समाजहित जपले जाईल. तंटे समाधानाने मिटतील.’’ जिल्हाधिकारी रेखावार, पोलिस अधिक्षक बलकवडे यांची भाषणे झाली. या वेळी ठेकेदार भादवणकर, डी. टी. पोवार यांचा सत्कार झाला.
सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश पाटील, नगरसेविका शुभदा जोशी, यास्मीन बुड्डेखान, यासीराबी लमतूरे, सुधीर कुंभार, आनंदा कुंभार, मलिककुमार बुरुड, नाथा देसाई, रमेश रेडेकर, एस. पी. कांबळे यांसह मान्यवर उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. गडहिंग्लजचे पोलीस उपअधिक्षक राजीव नवले यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com