राजर्षी शाहूंना अभिवादन

राजर्षी शाहूंना अभिवादन

GAD71.JPG
01153
गडहिंग्लज : राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या सांगता सोहळ्यात नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी 100 सेकंद स्तब्धता पाळून त्यांना अभिवादन केले.
--------------------------------------------------------
राजर्षी शाहूंना अभिवादन
गडहिंग्लज : लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी सोहळ्यानिमित्त गडहिंग्लज शहरासह तालुक्यात विविध संस्था, संघटनांतर्फे अभिवादन केले. १०० सेकंद स्तब्धता पाळून त्यांच्या कार्याला मानवंदनाही दिली.

* गडहिंग्लज नगरपरिषद
येथील नगरपरिषदेच्यावतीने कार्यालयात अधिकाऱ्‍यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्‍यांनी पालिका आवारात 100 सेकंद स्तब्धता पाळून त्यांच्या कार्याला अभिवादन केले.

* शिवराज महाविद्यालय
येथील शिवराज महाविद्यालयात अभिवादन केले. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम अध्यक्षस्थानी होते. शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. दिग्विजय कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले यांनी प्रास्ताविक केले. दरम्यान, राज्यशास्त्र विभागाच्यावतीने शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. दिग्विजय कुराडे यांचे ‘शाहू महाराज यांचे विचार, राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे डॉ.आर.पी.हेंडगे यांचे ‘राजर्षी शाहू महाराज यांचे आरक्षण धोरण, तर क्रीडा विभागातर्फे प्रा. संतोष पाटील यांचे शाहू महाराज यांचे कार्य आणि कर्तृत्व अशी तीन व्याख्याने झाली.

* ओंकार महाविद्यालय
ओंकार वरिष्ठ व राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे शाहू महाराजांचा स्मृतीदिन साजरा केला. संस्थाध्यक्ष राजन पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्र. प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांचे अध्यक्षीय भाषण झाले. सुरेश पोवार यांनी शाहू महाराजांच्या आठवणींना उजाळा दिला. कविता पोळ यांनी प्रास्ताविक केले. डॉ. काशिनाथ तनंगे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. प्रा. क्रांती शिवणे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शितल डवरी यांनी आभार मानले.

* बी. आर. स्कूल चन्नेकुप्पी
चन्नेकुप्पी (ता. गडहिंग्लज) येथील बी. आर. चव्हाण इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये राजर्षी शाहू महाराज शताब्दी सांगता सोहळा झाला. उपसरपंच रोहिणी भदरगे यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन झाले. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाहूंच्या कार्याचा आढावा घेतला. संस्थेचे अध्यक्ष उदयसिंह चव्हाण, मुख्याध्यापिका कलावती पाटील आदी उपस्थित होते.

* प्रशासकीय सेवा महाविद्यालय
महाराष्ट्र प्रशासकीय सेवा महाविद्यालयात आदरांजली वाहण्यात आली. प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिवादन केले. प्रतिमेचे पूजन प्र. प्राचार्या गंगाली पाटील व संस्थाध्यक्ष एम. जी. पाटील यांच्या हस्ते झाले.

* मराठा मंदिर महाविद्यालय
येथील मराठा मंदिर ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अ‍ॅन्ड कॉमर्स महाविद्यालयात अभिवादन केले. रोहन अष्टेकर अध्यक्षस्थानी होते. भरत गौड यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी शाहूंच्या कार्याचा आढावा घेतला. सानिका कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य भुईंबर यांनी राजर्षी शाहूंविषयी माहिती दिली. प्रा. नेहा पाटील, प्रा. नफीसा पानारी यांनी नियोजन केले.

* जागृती प्रशाला
येथील जागृती प्रशालेत आदरांजली वाहण्यात आली. दहावी पालक, शिक्षक व विद्यार्थी सभा उत्साहात झाली. निवृत्त शिक्षक सुरेश बुगडे यांनी विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शन केले. संपत सावंत यांनी शाहूंच्या कार्याचा आढावा घेतला. एम. बी. गुलगुंजी यांनी स्वागत केले. नागेश चौगुले, सुवर्णा पाटील व सुरेश बुगडे यांचा सत्कार मुख्याध्यापक विजयकुमार चौगुले यांच्याहस्ते झाला. श्री. चौगुले यांचे भाषण झाले. सावंत यांनी दहावीचे वर्षभरातील नियोजन सांगितले. विजयकुमार चौगुले यांचे अध्यक्षीय भाषण झाले. गीता पाटील, के. आर. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक एस. बी. अनावरे यांनी आभार मानले.

* दीनदयाळ विद्यालय, आजरा
आजरा ः येथील पंडीत दीनदयाळ विद्यालयात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृति शताब्दी सांगता समारंभ झाला. आजरा तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुधीर कुंभार यांच्याहस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन झाले व अभिवादन केले. पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा वार्षिक परीक्षा निकाल जाहीर केला. विद्यालयातील श्रुती आनंदा कांबळे, अलसीफा जमादार, ऋतुजा कदम यांनी शाहू महाराजांचा जीवन परिचय करून दिला अॅड. राजेंद्र देसाई आदी उपस्थित होते. भरत बुरुड यांनी सुत्रसंचालन केले. प्रकाश प्रभू यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com