ज्ञान किती घेता हे महत्वाचे

ज्ञान किती घेता हे महत्वाचे

gad83.jpg
01383
गडहिंग्लज : घाळी महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात डॉ. अजित जाधव यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. नागनाथ मासाळ, डॉ. मंगलकुमार पाटील, गजेंद्र बंदी, डॉ. सतीश घाळी, प्रा. अनिल उंदरे उपस्थित होते.
----------------------
ज्ञान किती घेता हे महत्वाचे
डॉ. अजित जाधव : घाळी महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ८ : ग्रामीण तरुण हा प्रचंड चिकाटी असणारा आहे. तुमचे शिक्षणाचे माध्यम कोणते आहे हे महत्वाचे नसून तुम्ही ज्ञान किती घेता हे महत्वाचे आहे. त्यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमातूनही उच्च पदावर पोचता येते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजित जाधव यांनी केले.
येथील डॉ. घाळी महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम झाला. यावेळी डॉ. जाधव बोलत होते. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी अध्यक्षस्थानी होते. दरम्यान, ९८ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला. डॉ. घाळी, संस्थेचे सहसचिव गजेंद्र बंदी यांचीही भाषणे झाली. . प्रा. अनिल उंदरे यांनी स्वागत केले. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या गुणवत्तेचा आलेख सांगितला. डॉ. नागनाथ मासाळ यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. प्रा. महेश कदम यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. मिलिंद पाटील यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com