जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रांची स्थिती

जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रांची स्थिती

विविध खेळांचा लोगो आवश्‍यक

‘व्हॉलीबॉल’च्या राज्यस्तरीय
प्रशिक्षण शिबिरास मिळेना मुहूर्त

निधी येऊन उलटला महिना

संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ : राज्यात यंदा शालेय स्तरावरील एकही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार नाही. यातून खेळाडूंचे नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने पंधरा खेळांच्या राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिरांच्या आयोजनासाठी निधी दिला आहे. कोल्हापुरातल्या जिल्हा क्रीडा कार्यालयावर व्हॉलीबॉलच्या प्रशिक्षण शिबिराची जबाबदारी सोपवली आहे. त्याकरिता २९ मार्च २०२३ ला ६ लाख ५० हजार ७९० रूपयांचा निधी वितरित झाला आहे. त्याला महिना उलटला तरी प्रशिक्षण शिबिराला मुहूर्त मिळालेला नाही.
राज्यभरात एकूण १५ खेळांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जात आहे. यात मैदानी, जलतरण, कबड्डी, धनुर्विद्या, रोलिंग, रोईंग, खो-खो, हॉकी, जिम्नॅस्टिक, नेमबाजी, बॅडमिंटन, कुस्ती, टेबल-टेनिस, लॉन टेनिस, व्हॉलीबॉलचा समावेश आहे. राज्यभरातून सतरा वर्षाखालील गटातील प्रत्येकी बारा मुले व मुली, तर एकोणीस वर्षाखालील प्रत्येकी बारा मुले व मुली, अशा एकूण ४८ खेळाडूंच्या कौशल्याला शिबिरातून दिशा द्यायची आहे. क्रीडा मार्गदर्शक जमीर अत्तार, संदीप उईके यांची शिबिरासाठी क्रीडा मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे.
महिनाभरापूर्वी निधी येऊनही व्हॉलीबॉलच्या शिबिरासाठी हालचाली नाहीत. शिबिरासाठ सुविधा उपलब्ध असताना दिरंगाई होत असल्याचा खेळाडूंचा सूर आहे. खेळाडूंच्या निवड प्रक्रियेला इतका उशीर का लागतो, असा प्रश्‍न प्रशिक्षकांना पडला आहे. मेचा दुसरा आठवडा सुरू झाला असून, शिबिर लवकर व्हावे, ही त्यांची अपेक्षा आहे.

कोट
खेळाडूंची यादी अद्याप पक्की झालेली नाही. त्याचा फॉलोअप घेत आहोत. तीन-चार दिवसांत ते काम पूर्ण झाल्यानंतर शिबिर घेतले जाईल.
-डॉ. चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडाधिकारी

खेळ* जिल्हा* निधी
जलतरण, जिम्नॅस्टिक्स, नेमबाजी, टेबिट-टेनिस, लॉन टेनिस, हॉकी* पुणे*४५ लाख ८९ हजार ५८०
बॅडमिंटन*नागपूर*३ लाख ४३ हजार ३५०
धनुर्विद्या*अमरावती*४ लाख ७५ हजार ११०
व्हॉलीबॉल*कोल्हापूर*६ लाख ५० हजार ७९०
मैदानी*नाशिक*२४ लाख ६७ हजार ५३०
कुस्ती*सातारा*४ लाख ७५ हजार ११०
खो-खो* सांगली*५६ लाख ५० हजार ७९०
----*मुंबई शहर*१ लाख ९६ हजार ९५०
----*अहमदनगर*६ लाख ५० हजार ७९०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com