खेळातील व्यावसायिक संधी भाग ४

खेळातील व्यावसायिक संधी भाग ४

मालिका लोगो आज प्रसि टुडे ः भाग ४


क्रीडा पत्रकारी; आहे भन्नाट अन् भारी

सुयोग घाटगे : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ : क्रीडा प्रकार फक्त काही लोकांपुरता मर्यादित न राहता तो न खेळणारे व न समजणाऱ्यासाठीही आवश्यक असाच आहे. यासाठी पत्रकारिता दुवा म्हणून महत्वाचे क्षेत्र ठरत आहे . प्रत्येक वृत्तपत्रात आवर्जून असणारे क्रीडा पान, क्रीडा विषयालाच वाहिलेली विविध प्रकाशने, क्रीडा टीव्ही चॅनेल यासर्व ठिकाणी क्रीडा पत्रकारांना नेहमीच विशेष जागा असते. क्रीडा पत्रकार होण्यासाठी क्रीडा क्षेत्राचा व भाषेचा अभ्यास, तसेच पत्रकारितेचा अभ्यास अथवा पात्रता असणे गरजेचे ठरते.

काय आहे क्रीडा पत्रकारिता?
खेळाची आवड असली व  त्याचा उत्तम अभ्यास असेल तर तुम्हाला क्रीडा पत्रकार होता येते. ही नोकरी वा स्वतंत्र व्यवसाय होऊ शकतो. यासाठी विविध विशेष अभ्यासक्रम आहेत. एखादा खेळाडू या व्यवसायाकडे वळत असेल तर खेळातील बारकावे व ते मांडण्याची पद्धत त्याला अंगभूत असते .

या आहेत संधी
 
फ्री लान्स स्पोर्टस्‌‍ जर्नालिस्ट
मुक्त क्रीडा पत्रकारिता हा आधीपासून असणारा प्रकार सध्या जोमात आहे. अनेक क्रीडा संघटना अथवा उद्योग समूह विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करतात. त्यांना याची प्रसिद्धीही करायची असते. अशा वेळी मुक्त क्रीडा पत्रकार हे चांगल्या प्रकारे करू शकतात. कोरोनानंतर कायमस्वरूपी नोकरी देण्यापेक्षा हंगामी काम करणाऱ्या मुक्त क्रीडा लेखकांना संधी अधिक मिळत आहे.

मुद्रित माध्यमांसाठी...
मुद्रित माध्यमांसाठी लेखन हा पत्रकारितेचा सर्वांत जुना प्रकार आहे. यामध्ये वर्तमानपत्र, मासिके अथवा अनेक वेबसाइटकरता लेखन करून व्यवसाय करू शकता. भारतातील विविध शिक्षणसंस्था पत्रकारिता अभ्यासक्रम चालवतात. मासकॉम म्हणजेच मास कम्युनिकेशन हा अभ्यासक्रमही लोकप्रिय आहे. कोणत्याही स्पर्धेचे वार्तांकन असो वा खेळाडूची घेतलेली मुलाखत हे सर्व वर्णनात्मक आपल्या शैलीमधे मांडून वाचकांच्या मनावर बिंबवता अले पाहिजे.
 
दृकश्राव्य माध्यम
टीव्हीमुळे अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. २४ तास क्रीडा विषयक माहिती देणारी अनेक चॅनल सध्या असल्याने हे सर्वात उपयुक्त करियर ठरू शकते.  यासाठी कॅमेऱ्यासमोर उभे राहून न अडखळता खेळाचे वर्णन करता यायला हवे.

सोशल मीडिया
फेसबुक, यूट्यूब, ट्विटर व  इन्स्टाग्राम या चार फ्लॅटफॉर्मवर ठसा उमटवून तुम्ही उत्तम पैसे कमावू शकता. तंत्रज्ञानाचा अभ्यास, त्यातील नवीन प्रकार सतत अभ्यासून ते अंगीकारणे जमायला हवे. झालेल्या गोष्टींवर त्वरित भाष्य करून ते रंजक पद्धतीने मांडता यायला हवेय

रेडिओ  
फक्त ऑडिओ म्हणजे श्राव्य माध्यमाचा वापर कमी झाला असला तरीही संपलेले नाही आहे. रेडिओवर बातम्या देणे किंवा क्रीडाविषयक कार्यक्रम, समालोचन करणे , ‘पॉडकास्ट’ करणे हे सर्व नोकरी व स्वतंत्र व्यवसाय म्हणून समोर आलेली संधी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com