महालक्ष्मी चरणी चांदीची पालखी अर्पण

महालक्ष्मी चरणी चांदीची पालखी अर्पण

gad810.jpg
01556
गडहिंग्लज : श्री गुरुसिद्धेश्‍वर, श्री भगवानगिरी, श्री निजलिंगेश्‍वर महास्वामी व डॉ. आनंद महाराज गोसावी यांच्या उपस्थितीत चांदी पालखीचे पूजन झाले. दुसऱ्‍या छायाचित्रात नगरप्रदक्षिणा सोहळ्यात हजारो कलशधारी महिला सहभागी झाल्या होत्या. (अमर डोमणे : सकाळ छायाचित्रसेवा)
----------------------------------------------------
महालक्ष्मी चरणी चांदीची पालखी अर्पण
नगरप्रदक्षिणा सोहळा; हजारो भाविकांना आमरस-पुरण पोळीचा महाप्रसाद
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ८ : कलशधारी सुवासिनी महिला, वाद्यांचा गजर, हजारो भाविकांच्या सहभागाने आणि चांगभलंच्या गजरात आज सायंकाळी येथील श्री महालक्ष्मी देवीच्या चरणी चांदीची पालखी अर्पण केली. तत्पूर्वी पालखीची नगरप्रदक्षिणा उत्साहात झाली.
हिरण्यकेशी नदी घाटावरुन सुवासिनींची कलश व पालखीचे पूजन झाले. नदीवेसमधील हनुमान मंदिरासमोर गुरुसिद्धेश्‍वर महास्वामी, भगवानगिरी महाराज, निजलिंगेश्‍वर महास्वामी, डॉ. आनंद महाराज गोसावी यांच्या उपस्थितीत पालखी व मंदिरावरील कळसाचे विधीपूर्वक पूजन व मंत्रपठण झाले. त्यानंतर सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये चांदीची पालखी व दुसऱ्‍या वाहनात कळस ठेवला. पुढे कलशधारी सुवासिनी आणि मागे चांदीची पालखी, कळस अशा पद्धतीने नगरप्रदशिक्षणेला प्रारंभ झाला. नदीवेस, शिवाजी चौक, नेहरु चौक, बाजारपेठ, मेन रोडसह शहरातील प्रमुख मार्गावरुन फिरुन या मिरवणुकीची महालक्ष्मी मंदिराजवळ सांगता झाली.
दरम्यान, रात्री नऊपासून भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. आमरस आणि पुरणपोळीच्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. यात्रा समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत महिलांनी पुरणपोळीच्या दुरड्या घेवून आल्या होत्या. वाद्यांचा गजर आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यात्रा समितीचे अध्यक्ष रमेश रिंगणे, विठ्ठल भमानगोळ, चंद्रकांत सावंत, अरविंद कित्तूरकर, राजेंद्र तारळे, सुरेश कोळकी, एल. डी. पोवार, प्रकाश शहा, यशवंत पाटील, सुधीर पाटील, बसवराज आजरी, राहूल शिरकोळे, रामगोंड उर्फ गुंडू पाटील, अजित विटेकरी, संदीप रिंगणे आदी उपस्थित होते.
----------------------
देवीला चांदीचा मुखवटा
दरम्यान, यात्रा समितीच्या आवाहनानुसार येथील माहेरवाशिण वर्षा सुनिल तोगी (आजरी) यांनी आईच्या स्मरणार्थ सव्वा लाखाचा चांदीचा मुखवटा (गोल्ड प्लेटेड) आज वाद्यांच्या गजरात आजरी कुटूंबियांकडून श्री महालक्ष्मी देवीला अर्पण केला. तत्पूर्वी वेद व मंत्रोपच्चाराने या मुखवट्याची प्राणप्रतिष्ठापणा केली. यावेळी आजरी कुटूंबिय उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com