परंपरा लाभलेली बिरदेव यात्रा

परंपरा लाभलेली बिरदेव यात्रा

श्री बिरदेव हिवरखान यात्रा, हातकणंगले विशेष----- रंगीत पट्टी
02048
02049

हातकणंगले गावचे ग्रामदैवत बिरदेव यात्रा आजपासून (ता. ११) सुरू झाली आहे. शनिवार (ता.13) पर्यंत होत आहे. यानिमित्त.....
-रावसाहेब कारंडे, हातकणंगले
-----
परंपरा लाभलेली बिरदेव यात्रा
हातकणंगले येथील बिरदेव मंदिराची स्थापना फार प्राचीन काळी येथे झाली. १९९२ मध्ये हातकणंगले येथील समस्त धनगर समाज व हातकणंगले गावातील दानशूर लोकांच्या देणगीतून हातकणंगले येथे सुंदर असे नवीन मंदिर उभारण्यात आले. हातकणंगले येथील बिरदेव हिवरखान देवाची जळाची परडी यात्रा दर चार वर्षातून करण्याची परंपरा फार प्राचीन काळापासून सुरू आहे. ती तीन दिवस चालते. पहिला दिवस देवाची परडी नदीला सोडण्याची परंपरा आहे. दुसरा दिवस गाव नैवेद्य व गावाला महाप्रसाद असतो. तिसऱ्या दिवशी पालखीची मिरवणूक काढण्यात येते. आसपासच्या ५० ते ६० गावांना भंडारा व खोबरे देऊन आमंत्रण देण्यात येते. गावातील लोक धनगरी ढोल घेऊन यात्रेत मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. यावेळी देवाची भाकणूक होते.
यात्रेस जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत. तसेच खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवडे, आमदार महादेव जानकर, आमदार राजेंद्र पाटील, माजी आमदार अमल महाडिक, अशोक माने, आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार राजू आवळे, अण्णासाहेब डांगे, सुजित मिणचेकर, अरुण इंगवले, नगराध्यक्ष अरुण जानवेकर व सर्व नगरसेक तसेच गावातील सर्व तालीम व तरुण मंडळे उपस्थित राहणार आहेत.
-----
कार्यक्रम असे ः
शुक्रवार (ता. १२) ः महाप्रसाद
शनिवार (ता. १३) पालखीची मिरवणूक, साडेबारा वाजता भंडारा फोडून यात्रेची सांगता
-------------------
(पुरवणी संकलन ः अतुल मंडपे, हातकणंगले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com