इंडस्ट्रियल क्रिकेट लीग

इंडस्ट्रियल क्रिकेट लीग

लोगो आजच्या पान १२ वरून......
००००००००००

2364
कोल्हापूर ः सकाळ माध्यम समूह व एच. आर. फोरम इंडियातर्फे सुरू असलेल्या स्पर्धेत शुक्रवारी साई सर्व्हिस विरुद्ध व्ही. पी. ग्रुप यांच्यातील सामन्यात साईचा अभिजित खाडे धावचित झाले तो क्षण.
(बी. डी. चेचर : सकाळ छायाचित्रसेवा)

02361
कोल्हापूर ः सप्रे प्रिसिजन टेक्नॉलॉजीसच्या प्रेमकुमारने व्ही. पी. ग्रुपच्या अभय तावरे याचा झेल घेतला तो क्षण.


साई, व्ही. पी. ग्रुप, सप्रे संघांचे दिमाखदार विजय

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ : चौकार व षटकारांच्या आतषबाजीला क्रिकेटप्रेमींची मिळालेली दाद आज वैशिष्ट्यपूर्ण ठरली. एकेक धाव काढण्यासाठी फलंदाजांची धडपड, टिच्चून गोलंदाजी, तर क्षेत्ररक्षणातील कस पाहायला मिळाला. निर्धारित सहा षटकांत आव्हानात्मक धावांचा पाठलाग करताना फलंदाजांना समर्थकांचा मिळालेला पाठिंबा उत्साहवर्धक ठरला. निमित्त होते सकाळ माध्यम समूह व एच. आर. फोरम इंडियातर्फे आयोजित पहिल्या इंडस्ट्रियल क्रिकेट लीग स्पर्धेचे. शास्त्रीनगर मैदानावर स्पर्धा सुरू आहे.

2352
सप्रे प्रिसिजन टेक्नॉलॉजीस विरुद्धच्या सामन्यात सर्वोत्कृष्ट खेळ केलेल्या साई ग्रुपच्या सचिन देवकरला सामनावीर चषक देताना शशी नाईक.

साई सर्व्हिसची सप्रे टेक्नॉलॉजीसवर सरशी...
सप्रे प्रिसिजन टेक्नॉलॉजीसने ६ षटकांत चार गडी गमावून ५० धावा केल्या. त्यांचे चार गडी बाद झाले. सप्रे प्रिसिजनकडून विनायक जठारने १४ चेंडूत १९ धावा केल्या. साई सर्व्हिसकडून श्रीकांत पाटीलने दोन, तर आशिष तांबेकरने एक गडी बाद केला. साई सर्व्हिसने ४ षटके व चार चेंडूत ५२ धावा फटकावून सामना जिंकला. त्यांच्या सचिन देवकरने १५ चेंडूत २९ धावा केल्या. त्याने तीन चौकार व एक षटकार ठोकला. प्रवीण उन्हाळेने ७ चेंडूत १३ धावा केल्या. सप्रे प्रिसिजनकडून रोहन चरणकरने एक गडी बाद केला.
००००००००००००००००

02357
कोल्हापूर : रॉकेट इंजिनिअरिंगविरुद्धच्या सामन्यात बहारदार कामगिरी केलेल्या व्ही. पी. ग्रुपच्या श्रीधर पाटील यांना सामनावीरचा चषक देताना गणेश पोळ.


व्ही. पी. ग्रुपची रॉकेट इंजिनियअरिंगवर मात
व्ही. पी. ग्रुपने रॉकेट इंजिनिअरिंग प्रायव्हेट कंपनीवर दहा गडी राखून विजय मिळवला. रॉकेट इंजिनिअरिंगने प्रथम फलंदाजी करताना ६ षटकांत सहा गडी गमावून ३५ धावा केल्या. त्यांच्या कुमार इंगळे यांनी आठ धावा केल्या. व्ही. जी. ग्रुपकडून श्रीधर पाटील यांनी तीन, तर विनायक काळे यांनी एक गडी बाद केला. प्रत्त्युतरादाखल व्ही. पी. ग्रुपने २ षटके व एका चेंडूत ३९ धावा फटकावून सामना जिंकला. त्यांच्या श्रीधर पाटील यांनी १० चेंडूत तीस धावा केल्या. त्यात एक षटकार व पाच चौकारांचा समावेश होता. तेच सामनावीर ठरले.
००००००००००००००००००००

KOP23M02351
साई सर्व्हिस विरुद्धच्या लढतीत सामनावीरचा मान मिळविलेल्या व्ही. पी. ग्रुपच्या विनायक काळे यांना सामनावीरचा चषक देताना महेश झोरे.

व्ही. पी. ग्रुपची वादळी खेळी
साई सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विरूद्ध व्ही. पी. ग्रुप यांच्यात सामना झाला. त्यात साई सर्व्हिसने ६ षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात ६२ धावा केल्या. त्यांच्या अभिजित चौगुले यांनी ११ चेंडूत २५ धावा केल्या. त्यांनी तीन षटकार व एक चौकार ठोकला. व्ही. जी. ग्रुपकडून अरविंद इंगळे यांनी तीन, तर राहुल गोठणकर यांनी एक गडी बाद केला. उत्तरादाखल व्ही. पी. ग्रुपने ४ षटके व दोन चेंडूत बिनबाद ६४ धावा करत सामना जिंकला. त्यांच्या श्रीधर पाटील यांनी १४ चेंडूत ३४ धावा केल्या. त्यांनी दोन षटकार व चार चौकार ठोकले. विनायक काळे यांनी १३ चेंडूत २४ धावा केल्या. विनायक काळे सामनावीर ठरले.

००००००००००

02348
रॉकेट इंजिनिअरिंगविरुद्ध अप्रतिम खेळी केलेल्या सप्रे प्रिसिजन टेक्नॉलॉजीसच्या प्रेमकुमार विद्यागज यांना सामनावीरचा चषक देताना प्रवीण खेडेकर.

सप्रे टेक्नॉलॉजीविरुद्ध रॉकेट इंजिनिअरिंग पराभूत...
सप्रे प्रिसिजन टेक्नॉलॉजीने प्रथम फलंदाजी करताना रॉकेट इंजिनिअरिंग प्रायव्हेट कंपनीवरसमोर ७० धावांचे आव्हान ठेवले. त्यांचे सहा गडी बाद झाले. त्यांच्या प्रेमकुमार विद्यागज यांनी १६ चेंडूत ४० धावांची वादळी खेळी केली. त्यांनी पाच चौकार व एक षटकार खेचला. अमर पाटील यांनी १४ चेंडूत १५ धावांचे योगदान दिले. रॉकेट इंजिनिअरिंगच्या फलंदाजांना आव्हान पेलवले नाही. त्यांना ६ षटकांत ३६ धावा करता आल्या. त्यांचे सहा गडी बाद झाले. त्यांच्या दीप वसा यांनी सर्वाधिक १३ धावा केल्या. सप्रे प्रिसिजनकडून प्रवीण कणेरी यांनी दोन, सचिन पाटील व प्रसाद पाटील यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रेमकुमार विद्यागजला सामनावीरचा मान मिळाला.
०००००००००००००००००

2344
व्ही. पी. ग्रुप विरुद्ध सामन्यात सप्रे प्रिसिजन टेक्नॉलॉजीसच्या रोहन चरणकर यांना सामनावीरचा चषक देताना अजय सप्रे.

सप्रे टेक्नॉलॉजीकडून व्ही. पी. ग्रुपचा पराभव...
सप्रे प्रिसिजन टेक्नॉलॉजीने ६ षटकांत चार गडी गमावून ७३ धावा केल्या. त्यांच्या फारूक जमादार यांनी १२ चेंडूत १८, तर विनायक जठार यांनी ७ चेंडूत १४ धावा केल्या. व्ही. पी. ग्रुपकडून भाऊसाहेब पाटील यांनी एक गडी बाद केला. उत्तरादाखल व्ही. पी. ग्रुपला ५२ धावा करता आल्या. त्यांचे सात गडी तंबूत परतले. त्यांच्या श्रीधर पाटील यांनी ८ चेंडूत १८ धावा फटकावताना दोन षटकार व एक चौकार ठोकला. सप्रे प्रिसिजनकडून रोहन चरणकर यांनी तीन, तर प्रवीण कणेरी यांनी दोन गडी बाद केले. चरणकर यांनी सामनावीरचे बक्षीस मिळवले.
०००००००००००००००

02342
रॉकेट इंजिनिअरिंगविरुद्धच्या लढतीत सामनावीरचा मान मिळविलेल्या साई सर्व्हिसच्या श्रीकांत पाटील यांना सामनावीर चषक देताना विठ्ठल पोळ.

साई सर्व्हिसची रॉकेट इंजिनिअरिंगवर १७ धावांनी मात....
साई सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडने रॉकेट इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर १७ धावांनी मात केली. प्रथम फलंदाजी करताना साई सर्व्हिसने ६ षटकांत तीन गडी गमावून ६१ धावा केल्या. अभिषेक खाडे यांनी १५ चेंडूत २३ धावा केल्या. त्यात तीन चौकारांचा समावेश होता. रॉकेट इंजिनिरिंगकडून प्रवीण तळेकर यांनी एक गडी बाद केला. प्रत्युतरादाखल रॉकेट इंजिनिअरिंगला ६ षटकांत ६ बाद ४४ धावा करता आल्या. त्यांच्या कपिल रसाळ यांनी १२ चेंडूत १५, तर अभिजित चौगुले यांनी १० चेंडूत १४ धावांचे योगदान दिले. साई सर्व्हिसकडून श्रीकांत पाटील यांनी दोन, तर आशिष तांबेकर यांनी एक गडी बाद केला. श्रीकांत पाटील सामनावीर ठरले.
----------------
आजचे सामने असे :
* सकाळी ८ - कॅस्प्रो विरुद्ध मौर्या
* सकाळी ९ - दाना कोल्हापूर विरुद्ध गोकुळ दूध
* सकाळी १० - कॅस्प्रो विरुद्ध गोकुळ दूध
* सकाळी ११ - दाना कोल्हापूर विरुद्ध मौर्या
* दुपारी ३ - कॅस्प्रो विरुद्ध दाना कोल्हापूर
* सायंकाळी ४ - मौर्या विरुद्ध गोकुळ दूध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com