अमृत दोन कामे

अमृत दोन कामे

02378

तांत्रिक मंजुरी सुटली,
प्रशासकीय अडकली

अमृत-दोन योजनेतील कामांची स्थिती; ३३३ कोटींसाठी प्रतीक्षा

उदयसिंग पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.१२ ः शहरातून होणारे पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अमृत-दोन योजनेतून ३३३ कोटी मंजूर झाले. यातून शहरातील चार झोनमध्ये ड्रेनेजलाईन टाकण्याबरोबरच आवश्‍यक ठिकाणी दोन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवले जाणार आहेत. ही कामे झाल्यानंतर संपूर्ण शहर मलनिस्सारण व्यवस्थापनांतर्गत येणार आहे. सध्या त्याची नितांत आवश्‍यकता असून, तांत्रिक मंजुरी तातडीने झाल्यानंतर प्रशासकीय मंजुरी मात्र दोन महिन्यांपासून अडकली आहे.
मोठ्या योजना राबवल्या जात असताना तांत्रिक मंजुरी किचकट समजली जाते. या टप्प्यावरच अनेक त्रुटी काढून त्या दुरुस्त करून घेतल्या जातात. त्यामुळे ही मंजुरी अनेकवेळा लांबलेली असते. त्यातील मंजुरी झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सोपी समजली जाते; पण महापालिकेतील अमृत-दोन योजनेतील कामांची प्रशासकीय मंजुरी रखडली आहे. पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी विविध ठिकाणची कामे आवश्‍यक होती. जयंती नाला, दुधाळी नाला, लाईनबाजार नाला, तसेच बापट कँप झोनमध्ये आवश्‍यक ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभा करणे, जिथे ड्रेनेजलाईन नाही तिथे टाकून ते सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकडे वळवणे ही महत्त्वाची कामे प्रस्तावित केली होती. त्याला तत्त्वतः मंजुरी दिल्यानंतर महापालिकेने प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवले.
त्यातील बापट कँप झोनमधील प्रस्ताव सोडल्यास दुधाळी, जयंती व लाईनबाजार या झोनमधील प्रस्तावांची तांत्रिक मंजुरी झाली आहे. त्यात दोन छोटे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असून, ९० किलोमीटरच्या आसपास ड्रेनेजलाईन आहेत. त्याच्या आराखड्यांना जीवन प्राधिकरणने तांत्रिक मंजुरी दिली आहे. सध्या ती नगरविकास विभागाकडे प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवली आहे. ही मंजुरी झाल्यास त्याचा आदेश निघून पुढील प्रक्रिया राबवली जाईल. बापट कँप झोनमध्ये एक प्रक्रिया प्रकल्पाबरोबरच १४७ किलोमीटरच्या ड्रेनेजलाईन आहेत. याबाबत जीवन प्राधिकरणकडून तांत्रिक मंजुरीसाठी प्रस्ताव गेला आहे. त्यांनी काढलेल्या त्रुटींची पूर्तता केली जात असल्याने वेळ लागत आहे; पण इतर प्रकल्पांची प्रशासकीय मंजुरी अडकली आहे.

चौकट
रंकाळा तलाव शुद्धीकरणही अडकले
अमृत दोन योजनेतूनच रंकाळा तलावातील पाणी शुद्धीकरणासाठी ११.९९ कोटींचा प्रस्ताव आहे. त्याबाबतही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. लक्षतीर्थ तलावाचे संवर्धन तांत्रिक अडचणीमुळे करता येणार नाही. त्यामुळे एकाच तलावाचे काम प्रस्तावित केले आहे.

ग्राफ करणे

तांत्रिक मंजुरी झालेले प्रकल्प

दुधाळी झोन
-एक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प-१३ कि.मी.
-ड्रेनेजलाईन-५७ कोटी

जयंती झोन
-एक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प-३३ कि.मी.
-ड्रेनेजलाईन-५२ कोटी

लाईन बाजार झोन
-४७ कि.मी
-ड्रेनेजलाईन-३२ कोटी
......
तांत्रिक मंजुरीत अडकलेला प्रकल्प
बापट कँप झोन
-एक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प-१४७ कि.मी.
-ड्रेनेजलाईन-१८० कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com