पोलिस वृत्त एकत्रित

पोलिस वृत्त एकत्रित

बसस्थानक परिसरात एकावर चाकू हल्ला

कोल्हापूरः कोणतेही कारण नसताना पैसे मागितल्यावर ते दिले नाहीत म्हणून मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एकावर चाकू हल्ला झाला. यामध्ये आकाश राजेंद्र देशिंगे (वय २०, रा. शहापूर, इचलकरंजी) हा तरुण जखमी झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्यवर्ती बसस्थानक परिसरात दहा मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास फिर्यादी आकाश देशिंगे हा देशी दारू दुकानासमोर नशेत बसला होता. तेथे दोन अनोळखी तरुण आले. त्यांनी पैसे मागितले. पैसे न दिल्यामुळे त्यांनी आकाशला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यातील एकाने त्याच्या पोटावर चाकूने वार केले. यात आकाश जखमी झाला. शाहूपुरी पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.
------------

नोकरीच्या अमिषाने दोन लाखांची फसवणूक

कसबा बावड्यातील दोघांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर,ता. १२ ः नोकरी देतो असे सांगून कसबा बावड्यातील दोघांची सुमारे दोन लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला. राहुल बनसोडे आणि प्रदीप प्रकाश घुले (रा.कसबा बावडा, प्रगती कॉलनी) यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कसबा बावडा येथील प्रगती कॉलनीमध्ये फिर्यादी प्रियंका अंकुश कांबळे या राहतात. ऑगस्ट २०२१ ते १० मे २०२३ दरम्यान संशयित आरोपींनी फिर्यादी व तिच्या बहिणीस नोकरी लावण्याचे अमिष दाखविले. त्यांच्याकडून वेळोवेळी अशा एकूण सुमारे २ लाख १० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. तसेच त्यांनी पैसे परत मागितले असता जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. याबाबत फिर्यादी प्रियंका यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी राहुल बनसोडे आणि प्रदीप घुले यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
----------

राजेंद्रनगरात एकावर चाकू हल्ला
कोल्हापूर, ता. १२ - टीव्हीची केबल तोडल्याच्या कारणावरून राजेंद्रनगरात एकावर चाकू हल्ला झाला. यात सचिन अशोक कांबळे (वय ३०, रा.शक्ती तरुण मंडळाजवळ, राजेंद्रनगर, कोल्हापूर) हे जखमी झाले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुकुंद ज्ञानदेव मस्के, अलका मुकुंद मस्के (दोघे. रा.शक्ती तरुण मंडळाजवळ) यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती राजारामपुरी पोलिसांकडून देण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता.१०) रात्री अकराच्या सुमारास फिर्यादी यांच्या दारात येवून संशयित आरोपींनी टीव्हीची केबल तोडली. फिर्यादीचे नाव घेवून मोठमोठ्याने शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी सचिन यांच्या अंगावर धावून जावून चाकूसारख्या धारदार हत्याराने डोकीत वार केला.
-----------

पती- पत्नीकडून महिलेस मारहाण

कोल्हापूरः कदमवाडी येथे स्पेअर पार्टच्या दुकानावरील गंजलेले जुने पत्रे काढून नवे घालताना झालेल्या वादातून महिलेस पती-पत्नीने मारहाण केल्याबद्दलचा गुन्हा शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाला. अलका संभाजी पाटील आणि संभाजी बाबासाहेब पाटील (दोघे.रा. कदमवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याची फिर्याद कदमवाडीतील सोनल कॉलनीतील जखमी सीमा उत्तम पाटील यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com