डिकेटीईच्या १० विद्यार्थ्यांची निवड

डिकेटीईच्या १० विद्यार्थ्यांची निवड

ich125.jpg
02395
इचलकरंजी ः आंतरराष्ट्रीय सॉफटवेअर कंपनी असलेल्या हूनरटेक या कंपनीत निवड झालेले डिकेटीईचे विद्यार्थी.

डिकेटीईच्या १० विद्यार्थ्यांची निवड
इचलकरंजी, ता.१२ ः हूनरटेक या आंतरराष्ट्रीय सॉफटवेअर कंपनीच्यावतीने २०२२-२३ मध्ये आयोजित कॅम्पस इंटरव्हयूमधून डिकेटीईच्या १० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. हूनरटेक ही आंतरराष्ट्रीय सॉफटवेअर कंपनी असून याचे कार्यालय अमेरिका, युके, युरोप या देशात आहे. भारतामध्ये या कंपनीचे कार्यालय पुणे, मुंबई, बेंगलोर आणि हैद्राबाद येथे असून ही कपंनी सॉफटवेअर डेव्हलपमेंट, सेवा आणि तंत्रज्ञान तसेच सॉफटवेअर टेस्टींग आणि व्यवस्थापन सेवा यासारख्या सेवा देते.
या कॅम्पस इंटरव्हयू प्रोसेसमध्ये ऍप्टीटयूड टेस्ट, ग्रुप डिस्कशन, टेक्निकल इंटरव्हयू तसेच पर्सनल इंटरव्हयू इत्यादी फे-या घेण्यात आल्या. यामध्ये रोनक हंचाटे, श्रीकुमार फुटाणे, समृध्दी पाटील, मोहीत मोकाशी, राजेश्‍वरी निंबाळकर, मानसी कबाडे, अंजली कुचेकर, अबोली माने, सिध्दी पाटील, अपूर्वा रेंदाळे या विद्यार्थ्यांची चांगल्या पॅकेजवर निवड झाली. या प्लेसमेंटसाठी संस्थेचे इंजिनिअरींग विभागाचे टीपीओ प्रा.जी.एस. जोशी यांनी परिश्रम घेतले. संस्थाध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रभारी संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस. आडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे.पाटील, विभागप्रमुख डॉ. डी.व्ही. कोदवडे, डॉ.एस.ए.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com