क्रीडा संकुलासाठी पाच कोटीचा निधी

क्रीडा संकुलासाठी पाच कोटीचा निधी

क्रीडा संकुलासाठी पाच कोटीचा निधी
पालकमंत्र्यांची तत्वतः मंजुरी ः प्रस्ताव पाठविण्याची मनपाला सूचना

इचलकरंजी, ता. १२ ः शहरातील निरामय रिंगरोडवरील आरक्षीत जागेवर क्रिडा संकुल उभारणीसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत पाच कोटी अनुदान देण्यास पालक मंत्री दीपक केसरकर यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. या संदर्भातील प्रस्ताव सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. खासदार धैर्यशील माने यांनी याबाबतची मागणी पालकमंत्र्यांकडे केली होती. रविंद्र माने यांनी पाठपुरावा केला.
इचलकरंजी शहरातील वाढती लोकसंख्या आणि मर्यादीत भौगोलिक परिस्थिती पाहता शहरात खेळाडूंना आवश्यक क्रीडांगणांची उपलब्धता नाही. वस्त्रनगरीबरोबरच शहराची क्रिडानगर अशीही वेगळी ओळख आहे. अनेक खेळाडू कबड्डी, खो-खो, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल या माध्यमातून राष्ट्रीय पातळीपर्यंत खेळले आहेत. अनेक खेळाडू शासकीय सेवेत कार्यरत आहेत. खेळाडूंनी सध्या शहरात इंडोअर स्टेडियमची गरज असल्याचे खेळाडूंनी खासदार माने यांच्या निदर्शनास आणून दिले. त्या अनुषंगाने त्यांनी पालकमंत्री केसरकर यांच्याकडे सुसज्ज क्रिडागंणाची मागणी केली.
शहरातील निरामय रिंगरोडवरील नियोजीत न्याय संकुल लगत क्रिडांगणासाठी आरक्षीत जागा आहे. या जागेवर क्रिडा संकुल उभारण्याची मागणी रविंद्र माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. पालकमंत्र्यांनी या क्रीडा संकुलासाठी पाच कोटी रुपये देण्यास तत्वतः मंजुरी दिली आहे. त्यानुसार प्रशासन पातळीवर कार्यवाही सुरु झाली आहे. जिल्हाधिकारी रेखावार यांनी नगरपालिका प्रशासन अंतर्गत महापालिकेस याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली आहे. या क्रिडासंकुलामुळे शहराच्या वैभवात फार मोठी भर पडणार आहे. या क्रिडासंकुलात शासनाच्यावतीने प्रशिक्षण देण्याबाबत आपण प्रयत्न करणार आहे, असे माने यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com