‘रवळनाथ’च्या कार्यक्षेत्रात दिल्लीचा समावेश

‘रवळनाथ’च्या कार्यक्षेत्रात दिल्लीचा समावेश

gad131.jpg :
02551
एम. एल. चौगुले
-----------------------------
‘रवळनाथ’च्या कार्यक्षेत्रात दिल्लीचा समावेश

गडहिंग्लज, ता. १३ : येथील रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीच्या कार्यक्षेत्रात दिल्लीचा समावेश करण्याला केंद्रीय निबंधकांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे देशाच्या राजधानीत शाखा विस्ताराची संधी संस्थेला मिळाली आहे, अशी माहिती रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्लॉट खरेदी व घरबांधणीसाठीची कर्जमर्यादा ९० लाखापर्यंत वाढवल्याचेही त्यांनी सांगितले.
श्री. चौगुले म्हणाले, ‘महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बेळगाव व धारवाड जिल्हा इतकेच संस्थेचे कार्यक्षेत्र होते. परंतु, देशाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या संस्थेच्या सभासद व हितचिंतकांनी कर्नाटक, दिल्ली व गोव्यात शाखा उघडण्याची मागणी केली होती. त्यानुसार वार्षिक सभेच्या मंजुरीने केंद्रीय निबंधकांकडे प्रस्ताव पाठवला होता. त्याला नुकतीच मान्यता मिळाली आहे. कार्यक्षेत्रात गोव्याच्या समावेशासाठी पाठपुरावा सुरु आहे. सध्या प्लॉट खरेदी व घरबांधणीसाठी ७५ लाख रुपयांची कर्जमर्यादा होती. उपविधीतील बदलाच्या मान्यतेनुसार ही मर्यादा ९० लाख रुपयांपर्यंत वाढविण्यालाही मंजुरी मिळाली आहे.’
ते म्हणाले, ‘कार्यक्षेत्र व कर्जमर्यादावाढीच्या मंजुरीसाठी केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा, कर्नाटकच्या माजीमंत्री शशिकला जोल्ले, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे, सहकार आयुक्त अनिल कवडे, विभागीय सहनिबंधक अरुण काकडे, तत्कालिन जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, संतोष कल्याणी, राष्ट्रीय सहकार संघाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले.’ संचालक डॉ. आर. एस. निळपणकर, प्रा. विजय आरबोळे, मीना रिंगणे, रेखा पोतदार, सीईओ डी. के. मायदेव आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com