संभाजी महाराज जयंती

संभाजी महाराज जयंती

फोटो- 2957(पान एक)
फोटो- 2956 (वाढाव्यात किंवा आतील पानातील बातमीत)
......

मर्दानी खेळ, शौर्यगीतांनी मिरवणुकांत वीरश्री

छत्रपती संभाजी महाराज जयंतीः बालमावळे एतिहासिक वेशभूषेत सहभागी

कोल्हापूर, ता. १४ : मर्दानी खेळाची थरारक प्रात्यक्षिके, लेसर शोचा झगमगाट व मोठ्या आवाजात लावलेली शौर्यगीते अशा वातावरणात छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुका वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या. हातात भगवे झेंडे नाचवत व कपाळावर भगव्या पट्ट्या बांधून कार्यकर्ते मिरवणुकांत सहभागी झाले. रात्री उशिरापर्यंत मिरवणुकीत कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता.
संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वैविध्यपूर्ण उपक्रम घेतल्यानंतर ठिकठिकाणच्या मंडळांनी जयंतीची आज जय्यत तयारी केली. सकाळी जन्मकाळ सोहळा झाल्यानंतर दुपारी चारला चिमुकल्यांची बालमावळ्यांची वेशभूषा साकारण्याची लगबग सुरू झाली. कार्यकर्ते संभाजी राजांच्या पुतळ्याजवळ जमले. मोठ्या आवाजात लावलेल्या शौर्यगीतांनी परिसरात उत्साह निर्माण झाला. सायंकाळी पाचनंतर मिरवणुका पुढे पुढे सरकू लागल्या.
संयुक्त शाहूपुरीची मिरवणूक शाहूपुरी दुसऱ्या गल्लीतून सुरू होताच, कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला उधाण आले. डोक्यावर संयुक्त शाहूपुरी लिहिलेल्या पट्ट्या बांधून ते मिरवणुकीत सहभागी झाले. बालमावळ्यांच्या वेशभूषेत लहान मुले-मुली घोड्यावर स्वार झाली. भगवी साडी नेसलेल्या लहान मुलींनी हलगीच्या ठेक्यावर लाठीची थरारक प्रात्यक्षिके सादर केली. मुलांनी चौमुखी लाठी पवित्रा फेक सादर करत कार्यकर्त्यांची वाहवा मिळवली. बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका ते पुन्हा शाहूपुरी असा मिरवणुकीचा मार्ग राहिला.
बिंदू चौकातील धर्मवीर १४ तर्फे सायंकाळी मिरवणुकीस आतषबाजीत सुरवात झाली. झांजपथकाच्या ठेक्यावर चौकातून मिरवणूक मिरजकर तिकटीच्या दिशेने रवाना झाली. रथात ठेवलेला संभाजी राजांचा चौदा फुटी पुतळा आकर्षण होता. रथ दोरीच्या साह्याने कार्यकर्ते ओढत होते. ‘भारत का बच्चा बच्चा, जय श्रीराम बोलेगा’, हे गीत मिरवणुकीत लावले होते. बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका मार्गे बिंदू चौक येथे मिरवणूक आल्यानंतर सांगता झाली.
संयुक्त राजारामपुरीतील मिरवणूक सायंकाळी पाचच्या सुमारास मिरजकर तिकटी येथे आली. ‘राजं आलं जिंकूनिया जगभरी, शूर आम्ही सरदार’ गीतावर कार्यकर्ते डोलत होते. संभाजीराजांचा आकर्षक पुतळा मिरवणुकीत होता. ताराबाई रोडवरून एलबी गँगची मिरवणूक महाद्वार रोडवर आली. विचारे माळ येथील हिंदवी ग्रुप व संभाजीनगरातील शंभूप्रेमी कार्यकर्त्यांतर्फे मिरवणूक काढण्यात आली.
---------
चौकट

चोख पोलिस बंदोबस्त

मिरवणुकीत अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. विविध मंडळांच्या मिरवणुकांवर ते नजर ठेवून होते. बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर परिसरात ते थांबले होते.
--------

चौकट
संयुक्त रामानंदनगर- जरगनगरतर्फे
बुधवारी मिरवणूक

संयुक्त रामानंदनगर- जरगनगरतर्फे बुधवारी (ता.१७) मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्याची सुरवात रामानंदनगर पुलापासून होणार असून, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके त्यात सादर केली जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com