नाटय कलाकाराने आपला मूळ आवाज ओळखला पाहिजे

नाटय कलाकाराने आपला मूळ आवाज ओळखला पाहिजे

विद्यापीठ लोगो वापरा
-
फोटो 03096

नाट्य कलाकाराने आपला मूळ आवाज ओळखावा
प्रा. उमेश घळसासी; विद्यापीठात ‘शब्द आणि अभिनय’ यावर कार्यशाळा

कोल्हापूर, ता. १५ ः नाट्य कलाकाराने आपला मूळ आवाज ओळखला पाहिजे. सातत्याने आवाजाचा रियाज करायला हवा, असे नाट्य व चित्रपट प्रशिक्षक प्रा. उमेश घळसासी यांनी सांगितले. शिवाजी विद्यापीठातील संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागातर्फे आयोजित ‘शब्द आणि अभिनय’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेचा प्रारंभ सरस्वती पूजनाने झाली. अभिनय प्रकार, व्हाईस कल्चर, भूमिका अभ्यास तसेच एकाग्रता, आवाजासाठी वापरली जाणारी सप्तके आदी नाट्य कलेसाठी आवश्यक विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. प्रा. घळसासी यांनी विद्यार्थ्यांकडून विविध संस्कृत श्लोक, खेळ, आवाजासंदर्भातील व्यायाम करून घेतले. प्रा. डॉ. निखिल भगत यांनी स्वागत केले. डॉ. विनोद ठाकूर-देसाई यांनी प्रास्ताविक केले. अतुल परीट यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉ. संजय तोडकर यांनी आभार मानले. ध्वनी आणि रंगमंच व्यवस्था मल्हार जोशी यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com