पालीच्या नव्या प्रजातीचा शोध

पालीच्या नव्या प्रजातीचा शोध

03201, 03202
...

तामिळनाडूसह आंध्र प्रदेशातून
पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध

संशोधनामध्ये कोल्हापूरच्या अक्षय खांडेकर यांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १६ ः भारताच्या दक्षिण - पूर्वतटीय सदाहरित वनांमधून गेक्कोऐला उपपोटजातीतील दोन नविन पालींचा शोध लावण्यात ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संशोधकांना यश आले आहे. या संशोधनामध्ये ईशान अगरवाल, तेजस ठाकरे आणि कोल्हापूरच्या अक्षय खांडेकर यांचा सहभाग आहे.
बोटांच्या वैशिष्ट्यपूर्ण वक्राकार आकारांमुळे ही पाल सर्टोडॅक्टिलस या पोटजातीत मोडते. अंगावरील वैशिष्ट्यपूर्ण रंग, सरासरी छोटा आकार आणि मांडीवरील ग्रंथींचा अभाव यांमुळे या पालींचा समावेश गेक्कोऐला या उपपोटजातीत केला आहे. सर्टोडॅक्टिलस ईरुलाओरम या प्रजातीचा शोध तामिळनाडूच्या कांचीपुरम आणि तिरुवल्लूर या जिल्ह्यांमधून लागला आहे. ईरुला या अदिवासी द्रविडी जमातीवरुन या पालीचे नामकरण ‘ईरुलाओरम’ असे केलेले आहे. सर्टोडॅक्टिलस रेलिक्टस या प्रजातीचा शोध आंध्र प्रदेशामधील तिरुपती आणि नेल्लोर या दोन जिल्ह्यांमधून लागला आहे. सीमित अनुकूल भूप्रदेशात तगून राहण्यावरुन त्यांचे नामकरण रेलिक्टस या लॅटीन शब्दाने केलेले आहे. अंगावरील रंग आणि आकारांवरुन या दोन्ही पाली एकमेकांपासून आणि उपपोटजातीतील इतरांपासून वेगळ्या आहेत.

गेक्कोऐला ही उपपोटजात भारतीय द्वीपकल्प आणि श्रीलंकेमधे पसरलेली आहे. या उपपोटजातीतील पाली जमीनीवरती वावरतात. जमिनीवर वावरताना समतोल साधण्यासाठी वक्राकार बोटांची त्यांना मदत मिळते. आकर्षक रंगयोजन हे गेक्कोईला या उपपोटजातीतील पालींचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या पाली उष्णकटिबंधीय सदाहरीत वनांमधे सापडतात. पाला-पाचाळ्यांनी व्यापलेल्या जमीनीवर भक्ष्य पकडण्यासाठी या पाली रात्री बाहेर पडतात. छोटे किडे हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे.
...

कोट
‘भारतातील संशोधनाचा कल हा नेहमीच पश्चिम घाटाकडे कललेला आहे. दक्षिण-पूर्व भारतातील पर्वतांवरुन गेल्या काही वर्षांपासून सातत्याने नवीन प्रजाती सापडत आहेत. नव्याने सापडलेल्या दोन प्रजातींमुळे दक्षिण भारतातील उष्णकटीबंधीय सदाहरीत वनांचे जैवविविधतेच्या दृष्टीने असणारे महत्त्व अधोरेखित होत आहे.
- अक्षय खांडेकर, पीएचडी विद्यार्थी, शिवाजी विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com