नाईट कॉलेजमध्ये माजी विद्यार्थी मेळावा

नाईट कॉलेजमध्ये माजी विद्यार्थी मेळावा

ich163.jpg
03204
इचलकरंजी : प्रा. मिलिंद दांडेकर यांनी विद्यार्थी- पालक मेळावा मध्ये मार्गदर्शन केले.
नाईट कॉलेजमध्ये माजी विद्यार्थी मेळावा
इचलकरंजी : जीवनात शिक्षणाचे महत्व अनन्यसाधारण आहे. पालकांनी पाल्यावर संस्कार, विश्वास, नितीमुल्ये देणे आवश्यक आहेत. आजच्या सामाजिक जीवनात पालकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. शिक्षणाबद्दल आस्था निर्माण करणे, प्रोत्साहन देणे, शैक्षणिक बौद्धीक, समृद्धी वाढवणे गरजेचे आहे, असे मत माजी प्रा. मिलिंद दांडेकर यांनी व्यक्त केले. ते देशभक्त बाबासाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अॅण्ड कॉमर्स इचलकरंजी येथे माजी विद्यार्थी-पालक-शिक्षक संघटना मेळाव्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. एस. एल. रणदिवे होते. प्रा. डॉ. पुरंधर डी. नारे, प्रा. सौरभ पाटणकर, प्रा. एफ. एन. पटेल, प्रा. अभिजित पाटील, प्रा. जीवन पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत प्रा. डॉ. आर. व्ही. सपकाळ यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. डॉ. प्रविण पोवार यांनी केले. आभार प्रा. डॉ. एम.आर. मुंडकर यांनी मानले.
-------------------
रेशनकार्डची कामे खोळंबली
इचलकरंजी : पुरवठा कार्यालयातील पुरवठा अधिकारी यांची बदली झाल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. कार्यालयातून लॉगिन होत नसल्याने भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी उपजिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे कार्यवाही करण्याच्या सूचना केली आहे. पुरवठा अधिकारी अमित डोंगरे यांची बदली झाल्यानंतर तेथील तात्पुरता पदभार अधिकाऱ्यांकडे दिला आहे. पुरवठा कार्यालयामध्ये रेशनकार्डची सर्व कामे ऑनलाईनने केली जातात. अधिकारी डोंगरे यांची बदली झाल्यानंतर लॉगिनचे काम बंद झाले आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांची कामे खोळंबली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com