गोकुळ पत्रकार परिषद

गोकुळ पत्रकार परिषद

फोटो
...

‘गोकुळ’ची उलाढाल ३ हजार ४२० कोटींवर

मावळते अध्यक्ष विश्‍वास पाटील : मागील वर्षीपेक्षा ४९१ कोटींनी वाढ

कोल्हापूर, ता. १६ : ‘गोकुळ’च्या उत्पादक शेतकऱ्यांना दूध खरेदी दरात वाढ दिली. संघाची वार्षिक उलाढाल ३ हजार ४२० कोटी इतकी असून गेल्या वर्षीपेक्षा ही उलाढाल ४९१ कोटी रुपयांनी वाढली आहे. संघाच्या २७४ कोटींच्या ठेवी असून २३२ कोटींची दूध पावडर आणि बटर तयार आहे. दूध उत्पादकांना गोबर गॅसवर तब्बल १७ कोटी ५० लाख ६५ हजार रुपयांचे अनुदान मिळवून दिले असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी सांगितले. श्री. पाटील यांनी आज आपल्या पदाचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे राजीनामा दिला. हा राजीनामा संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.
श्री. पाटील म्हणाले, ‘गेल्या दोन वर्षांत अध्यक्षपदाची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली. या दोन वर्षांत गोकुळच्या ठेवींमध्ये आणि उपपदार्थ निर्मितीमध्ये ९४ कोटींची वाढ झाली आहे. फेब्रुवारी २०२२ ते ऑक्टोबर २०२२ दरम्यान म्हैस दूध खरेदी दर ८ रुपयाने व गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १० रुपयाने वाढ केली आहे. संघाची म्हैस दूध खरेदी सरासरी प्रति लिटर ५५ रुपये ६ पैसे व गाय दूध खरेदी ३७ रुपये २६ पैसे आहे. संघाकडून दूध उत्पादकांना बायोगॅस प्रकल्प दिला जातो. हा बायोगॅस प्रकल्प केवळ पाच हजार रुपयांमध्ये दिला जातो. तर, त्यावर ३४ हजार २०० रुपयांचे अनुदान असते. एक हजार गॅस दिले जाणार होते; पण एनडीडीबीकडून पाच हजार गॅस देण्याचे उद्दिष्ट दिले आहे. आता गोकुळकडे तब्बल ८ हजार ८०० दूध उत्पादकांनी मागणी केली आहे. दोन वर्षांमध्ये सात वेळा दूध खरेदी दरात वाढ केली आहे. जातिवंत म्हैस खरेदीसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात ५ हजार रुपयांची वाढ केली आहे. मुंबई शाखेचे विस्तारीकरण झाले आहे. नवीन पेट्रोल पंपासाठी मान्यता मिळाली आहे. २०२१-२२ मध्ये वासरू संगोपन योजनेंतर्गत १२ हजार १५८ पात्र जनावरे असलेल्या दूध उत्पादकांना एकूण १० कोटी २९ लाख रुपये अनुदान वाटप केले आहे.’ यावेळी ‘गोकुळ’चे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले उपस्थित होते.
.....

केंद्रीय दुग्ध मंत्र्यांकडून
होणार ‘गोकुळ’चा गौरव

‘गोकुळ’ने बायोगॅस योजना सक्षमपणे राबवली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. २२) पुणे येथे केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते ‘गोकुळ’च्या या उपक्रमाचे कौतुक होणार असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com