जाहिरात बातमी

जाहिरात बातमी

03231
कसबा बावडा : ‘विश्‍वकृती’च्या प्रारंभप्रसंगी डॉ. संतोष चेडे, अभय जोशी, डॉ. राजेंद्र रायकर, डॉ. किरण माने आदी.


डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये
राष्ट्रीय स्तरावरील ‘विश्‍वकृती’ स्पर्धा
कोल्हापूर : कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशनतर्फे ‘विश्‍वकृती’ ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा झाली. विद्यार्थ्यांना त्यांचे तांत्रिक कौशल्य, ज्ञान आणि नेटवर्क दाखवण्यासाठीची संधी देणाऱ्या या स्पर्धेत देशभरातून ५०० हून अधिक विद्यार्थी सहभाग झाले होते. यामध्ये बॉक्स फुटबॉल, द डिझायनर, इको काँक्रीट, सेतू बांधा रे, रील मेनिया, कॅरम आणि जब्रा फॅन अशा विविध तांत्रिक व सहअभ्यासक्रमविषयक स्पर्धांचा समावेश होता. सिव्हिल इंजिनिअरिंगमधील ‘द डिझायनर’ ही स्पर्धा वैशिष्ट्यपूर्ण ठरली, तर बॉक्स फुटबॉल या स्पर्धेत ५० हून अधिक संघ सहभागी झाले. यात आंतरराष्ट्रीय खेळाडूंची हजेरी रोमहर्षक ठरली. यामध्ये आयोजकांकडून सामाजिक व तांत्रिक विषयांवरील काही समस्यांचे निराकरण करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. विविध स्पर्धेतील विजेत्यांना चषक, प्रमाणपत्रे व रोख पारितोषिक देण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्‍वस्त आमदार ऋतुराज पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. या वेळी कार्यकारी संचालक डॉ. ए. के गुप्ता, प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे, विभाग प्रमुख डॉ. किरण माने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com